पान:निवडक अंतर्नाद.pdf/४८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दूधवाला, कचरेवाला, पेपरवाला आपले ठरलेले काम जास्तीत जास्त निष्ठापूर्वक व उत्तम करणे हेच समाजसेवेचे सर्वोत्तम रूप आहे. कारण शेवटी तुमचे सर्वांत महत्त्वाचे सामाजिक योगदान बहुतेकदा तुमच्या नियत कार्यक्षेत्रातच दिले जाते. उर्वरित दिवसभरात कितीही कटकटींना सामोरे जावे लागले, तरी माझ्या दिवसाची सुरुवात मात्र तशी प्रसन्न असते. ही सुरुवात होते तीन 'वालां' पासून दूधवाला, कचरेवाला आणि पेपरवाला, प्रातर्विधी जेमतेम उरकत असतात, तेवढ्यातच हे तिघे दाराशी हजर होतात - साधारण पावणेसात सातच्या दरम्यान, तसे ते खूपदा दृष्टीसही पडत नाहीत; आपले काम उरकून बाहेरच्या बाहेरच गुपचूप निघून जातात. पण ते यायची मी आतुरतेने वाट बघत असतो. कारण ते येऊन गेल्यानंतरच माझा पहिला चहा होतो आणि उठल्याउठल्या पेपर वाचण्याचे आता जणू व्यसनच जडून गेले आहे. इतकी वर्षे मी बघतो आहे; हे 'वाले' कधीही खाडा करत नाहीत. इतर सर्वांप्रमाणे त्यांना हक्काची साप्ताहिक सुट्टीही नसते. परीक्षेचे दिवस असोत की मतदानाचे, आजारपण असो की घरगुती अडचणी, थंडी असो की पाऊस, दिवाळी असो की दसरा - हे येतातच. अर्थात एखाददुसरा अपवाद सोडून द्या. उदाहरणार्थ, प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन वा अनंतचतुर्दशीनंतरच्या दिवशी पेपरवाला येत नाही; कारण आदल्या दिवशी वृत्तपत्रांना सुट्टी असल्याने नंतरच्या दिवशी पेपर नसतोच, पण यांतल्या एखाद्याचे असे न येणे हे अगदी अपवादस्वरूपच त्यांच्याशी असलेल्या माझ्या जुजबी तोंडओळखीनुसार हे 'वाले' फारसे शिकलेले नसावेत; आवर्जून दखल घ्यावी असे फारसे काही कर्तृत्व त्यांच्यापाशी बहुधा नसावे; आपल्या कामाचा आर्थिक मोबदलाही त्यांना विशेष काही मिळत नसावा. पण तरीही वर्षानुवर्षे, अत्यंत नियमितपणे, कसलीही तक्रार कुरकुर न करता ते आपले काम अगदी चोख करत आले आहेत. त्यांच्या या कार्यनिष्ठेचे मला नेहमीच खूप कौतुक वाटते. मध्यंतरी एकदा सहज त्यांच्याबद्दल विचार करत होतो आणि तेव्हा जाणवले, की आपल्या नकळत समाजात सुरळीतपणे चालत असलेल्या तीन प्रचंड यंत्रणांचे (सिस्टिम्सचे) हे तिघे अगदी छोटे असे हिस्से आहेत; त्या यंत्रणांची ही तीन जणू प्रतीके आहेत. संपादकीय तो दूधवाला घ्या. कुठल्यातरी खेड्यातला कोणीतरी शेतकरी रोज सकाळी आपल्या गोठ्यातल्या गाईंचे दूध काढतो, सहकारी ४८२ निवडक अंतर्नाद चा, पाश्च दूध सोसायटीतर्फे गोळा केले जाऊन ते दूध संकलन केंद्रावर येते. मग त्या दुधावरची दुधातील स्निग्धांश मोजणे, त्यानुसार त्याचे वर्गीकरण तिथून पुढे अमूल, गोकुळ, वारणा, चितळे, कात्रज अशा एखाद्या डेअरीत या डेअरींचे स्वत: चेही मोठे गोठे असू शकतात. आणि त्या दुधापासून पुढे दही, लोणी, चीज, आईस्क्रीम, श्रीखंड वगैरे अनेक पदार्थही तिथे बनतात. नंतर ते दूध छोट्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधे भरणे. वातानुकूलित टँकरमधून ते वेगवेगळ्या शहरांमधे व शहराच्या उपविभागांमधे पोचवणे आणि शेवटी वितरकांमार्फत ते घरोघर पोचणे, वर्षांचे बाराही महिने आणि अगदी रोजच्या रोज ही प्रचंड यंत्रणा कार्यरत असते. आमच्या घरी येणारा दूधवाला म्हणजे तिचे एक छोटेसे प्रतीक आमच्या लहानपणचा मुंबईतला दुधाचा तीव्र तुटवडा, ती दुधाची कार्डे, ते बूथ, होल मिल्क- येन्ड मिल्कच्या त्या बाटल्या, तिथल्या अस्ताव्यस्त रांगा, त्या धक्काबुक्की, दूध आणायला कोणी जायचे यावर घरोघरी भावाभावांमधे होणारी भांडणे वगैरे सगळे आठवले, की आजच्या या मुबलक दूधपुरवठ्याचे व दुग्ध-शृंखलेचे अधिकच कौतुक वाटते. हाच प्रकार कचरेवाल्याच्या बाबतीत प्रत्येक सदनिकेच्या दाराबाहेर ठेवलेल्या त्या कचऱ्याच्या बादल्या वा पिशव्या ओला कचरा- सुका कचरा असे त्याचे विभाजन, तो सगळा कचरा प्लॅस्टिकच्या मोठ्या ड्रम्समधे भरणे. मग महानगरपालिकेची घंटागाडी, पुढे कचरा डेपो, मोठ्या ट्रॅक्समधून तो आणखी लांब कुठेतरी नेणे, त्याचे पुन्हा वर्गीकरण, री-सायकलिंगसाठी त्यातील काच, प्लॅस्टिक, लाकूड, पत्रे वगैरे घटक वेगळे करणे. वीजनिर्मिती, खतनिर्मिती वगैरे वेगवेगळे प्रायोगिक प्रकार त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणारी, तो जाळणारी अवाढव्य यंत्रे, आत्यंतिक दुर्गंधीमुळे या सगळ्याला होणारा स्थानिक रहिवाशांचा विरोध, त्यातून कसाबसा काहीतरी मार्ग काढणे, कचरेवाल्याच्या मागे असते ती ही एक अविरत चालणारी, अगडबंब यंत्रणा, पेपरवाल्याच्या मागे असते तीही अशीच एक यंत्रणा, काळाच्या ओघात थोडीफार अधिक परिचित झालेली, वेगवेगळ्या वृत्तपत्रांची कार्यालये, तिथले बातमीदार, लिहिला जाणारा मजकूर,