पान:निवडक अंतर्नाद.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोणतीही गोष्ट नियमित होऊन बसली, की शिक्षा होऊन जाते. एकीकडे विचार प्रकटीकरणाची हौस मला एकापाठोपाठ एक 'अवधान' लिहायला प्रवृत्त करत होती. पण त्यासाठी पाळावी लागणारी शिस्त, घ्यावे लागणारे लेखनकष्ट हे सर्व तापदायक वाटत होते. हा त्रास मला लेखनापासून परावृत्त करत होता. याखेरीज इतर अडचणी जाणवायला लागल्या. 'अवधान' लिहिण्यात अडकून पडलं, की इतर बरीच अवधानं मागे पडतात हे लक्षात यायला लागलं. मुळात कोणत्याही स्वरूपाचं लेखन करताना अशी अडकून पडल्याची भावना असणं हे वाईट, सतत दुसऱ्याला काहीतरी सांगण्याचा एवढा अट्टाहास तरी कशासाठी? असे प्रश्न मनात यायला लागले. या अट्टाहासासाठी आपण काय किंमत चुकवतो आहोत? विचारमांडणीतून हाताशी काय लागतं? जे समविचारी असतात, ज्यांच्या मनातले विचार आपल्या विचारांशी जुळतात, त्यांना आपलं लिखाण आवडतं. मात्र ज्यांनी आपले विचार समजून घ्यावेत, आपल्या विचारांनी ज्यांच्या मनोभूमिकेत फरक पडावा असं आपल्याला वाटत असतं, त्यांच्यावर आपल्या वैचारिक मांडणीचा काही परिणाम होत नाही. ते काही केल्या आपले विचार सोडायला तयार नसतात. आपल्या लेखातील विरोधी विचारानं ते खवळून जातात; आपण त्यांच्या मनातून उतरतो. 'अंतर्नाद' साठी लिहिताना असे अनुभव अनेक येत गेले. प्रतिकूल मतांनी वाचक नाराज व्हायचे. मनातले विचार काहीशा आक्रमकपणे मांडण्याच्या माझ्या सवयीनं काही वाचकांचा क्षोभ त्यांनी पाठवलेल्या पत्रांतून व्यक्त व्हायचा. संपादकांकडे पत्रं जायची, त्यातली काही ते छापायचे, संकोचापोटी त्यांनी अनेक प्रतिकूल पत्र छापली नसावीत, असा माझा संशय आहे. प्रतिकूल पत्रातल्या सकारात्मक विधानांतून प्रश्नाची दुसरी बाजू आपल्यासमोर येईल; आपलं प्रबोधन होईल ही आशा मात्र फोल ठरली. माझ्या लेखानामुळे त्यांचा झालेला प्रक्षोभ तेवढा त्यांच्या पत्रातून दिसत गेला. मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायचा प्रयत्न त्यांच्यापैकी कोणी करत नसे. नुसताच त्वेष आणि दूषणं. पूर्वसूरीच्या अभ्यासकांनी, पंडितांनी मांडलेल्या सत्याला तुम्ही विरोध करता म्हणजे काय ? समजता कोण तुम्ही स्वत:ला ? असा सूर अनेक पत्रांत असायचा. गीता वाचताना मला कायम पडत असलेले एकदोन प्रश्न मी एकदा वाचकांसमोर ठेवले. आपल्या इच्छेविना या सृष्टीतलं पानही हलत नाही, असं गीतेत श्रीकृष्णानं म्हटलं आहे त्याचा संदर्भ घेऊन मी म्हटलं होतं, की संपूर्ण जगाचं नियंत्रण श्रीकृष्ण करत असेल तर परवाचे बॉम्बस्फोट श्रीकृष्णानं घडवून आणले, असं का नाही म्हणायचं? ओसामा बिन लादेन, दाऊद हे निमित्तमात्र आहेत, अर्जुनाप्रमाणे, श्रीकृष्णच त्यांच्याकरवी निरपराधांच्या हत्या घडवून आणतो आहे, असं आपण का नाही म्हणायचं ? श्रीकृष्णच जर सर्व सृष्टीला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावतो आहे; जगातल्या सर्व व्यवहाराला तोच जबाबदार आहे, तर अर्जुनाच्या ४८ निवडक अंतर्नाद मनात जे युद्धविरोधी विचार आले; धनुष्य टाकून तो खाली बसला, हे कोणी घडवलं? श्रद्धावान वाचकांचा या प्रश्नांमुळे प्रक्षोभ झाला. अद्दातद्दा भाषेत त्यांची मला पत्रं आली. पण एकानंही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला नाही. चांगलं वागण्यासाठी मोक्ष, स्वर्ग याची लालूच, आणि नरकाची दहशत कशासाठी? या प्रलोभनाविना किंवा भीतिविना माणूस चांगला वागू शकत नाही काय? असा माझा दुसरा प्रश्न होता. माझ्या धर्मप्रेमी वाचकमित्रांनी याबाबतही माझं प्रबोधन केलं नाही. म्हणजे माझ्या लिखाणापासून फायदा ना त्यांचा ना माझा. ही हताशता हेही लिखाण थांबवण्यामागचं एक कारण असावं. मी मांडलेले विचार फार नवीन नव्हते. "चांगल्या कृत्याबद्दल ईश्वराची पूजा करायची, तर वाईट घटनांबद्दल त्याला जबाबदार धरून त्याचा गळा का धरायचा नाही?" असा प्रश्न वि. दा. सावरकरांनीही आपल्या निबंधात विचारला होता. लेखातून मांडलेल्या शहाण्या किंवा मूर्ख प्रश्नांमुळे जी लहानमोठी वादळं निर्माण झाली त्या वादळांत भानू काळे आणि वर्षा काळे हे संपादक दाम्पत्य माझ्यामागे ठामपणे उभं राहिलं. माझ्या विवेचनातले मुद्दे स्वतःच्या मनाला पटोत न पटोत, व्हॉल्तेअरच्या वचनाला जागून, त्यांनी प्रतिकूल मत प्रतिपादन करण्याच्या माझ्या अधिकाराला भक्कम पाठिंबा दिला. सह- संपादिका स्नेहा अवसरीकर हिनंही माझ्या लिखाणामागील सचोटीला आणि वैचारिक निष्ठेला अशा समरप्रसंगी नैतिक पाठबळ पुरवलं. मला आठवतं, एका लेखात मी रामकृष्ण परमहंसांच्या संदर्भातल्या माझ्या शंका मांडल्या होत्या. परमहंसांनी आयुष्यात पैशाला कधी स्पर्श केला नाही अशी आख्यायिका आहे. स्वामी पैशाला स्पर्श न करता जगू शकले कारण कोणी ना कोणी त्यांच्या वतीनं पैशाला स्पर्श करण्याचं पाप करत होतं, असं मी म्हटलं होतं. त्यावर स्वामिभक्तांनी गदारोळ केला. मला त्याबद्दल माफी मागावी असं तेव्हा वाटलं नाही; आताही वाटत नाही. उलटपक्षी, अज्ञानावर आधारलेल्या श्रद्धा दुखावल्याबद्दल माफी मागण्यानं अज्ञानाचा गौरव होतो, असं मला वाटत आलं आहे. अज्ञान माझ्या प्रतिपादनामागंही असू शकतं, पण ते दाखवून द्यायचा प्रयत्न या मंडळींपैकी कोणालाही करावासा वाटला नाही, हे मला आज या अखेरच्या 'अवधान'मध्ये स्पष्टपणे मांडावसं वाटतं. मनमोकळेपणानं आपल्या मनातले प्रश्न मांडणं हा काही सामाजिक गुन्ह्य नाही. या कृत्यानं कोणाची मनं दुखावली जात असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. असहिष्णुता हा मानवी विकार आहे असं मी मानतो. मी काय असं विघातक बोलत होतो? संतमंडळींच्या संदर्भातल्या खऱ्याखोट्या आख्यायिकांपेक्षा त्यांचे विचार महत्त्वाचे, हे मी निराळ्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करत होतो. पण संतवचनांऐवजी पादुका पुजण्यात धन्यता मानणाऱ्या वाचकांच्या