पान:निवडक अंतर्नाद.pdf/४९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणण्याचा शिरस्ता अंतर्नादने यापूर्वी जपला आहे. त्या धोरणाला अनुसरून पुण्याबाहेर राहूनही साहित्यसेवा करणाऱ्यांना 'कथामंथन' सारख्या जाणिवा विस्तारणाऱ्या उपक्रमात सहभागी करून घेणे योग्य झाले असते. खटकलेली बाब निदर्शनास आणून दिल्याशिवाय राहवेना, म्हणून हे पत्र, देवकिसन सारडा, नाशिक (दिवाळी २००७) एकेरी उल्लेख आणि पारंपरिकता यास्मिन शेख यांनी श्री. म. माटे यांच्यावर लिहिलेला हृदयंगम लेख वाचला, माटे यांचे सुस्पष्ट व्यक्तिचित्रण आणि लेखिकेचे उत्कट भावदर्शन या दोन्ही दृष्टींनी लेख प्रशंसनीय आहे. मात्र, उत्कट गुरुभक्ती अनाठायी समर्थन करण्यास कशी प्रवृत्त करते, याचे एक मजेदार उदाहरणही या लेखात आहे. यास्मिन शेख लिहितात, "आम्ही महाविद्यालयात असताना ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम, शिवाजी इ. पुरुषांचा एकेरी उल्लेख करण्याची पद्धत होती. या एकेरी उल्लेखाने त्या थोरांचा उपमर्द करावा असा त्याचा अर्थ नव्हता, ऐतिहासिक काळात जमा झालेल्या व्यक्तींचा असा एकेरी उल्लेख त्या काळात होत असे... हे आजच्या पिढीला आक्षेपार्ह वाटू नये म्हणून हे स्पष्टीकरण देते, " तथापि त्यांनी माटे यांच्या व्याख्यानातील त्यांचे उद्गार जे उद्धृत केले आहेत, ते पुढीलप्रमाणे आहेत : "तुकारामाला (एकेरी उल्लेख) प्रपंचाबद्दल प्रश्न पडला. प्रपंच मिथ्या असून परमार्थ श्रेष्ठ होय असा उंच घोष करणारा (एकेरी उल्लेख) प्रपंचविन्मुख तुकाराम हे महाराष्ट्राचे एक स्वतंत्र स्फुरण आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करणारा (एकेरी उल्लेख) शिवाजी हा (एकेरी उल्लेख) प्रपंचशूर.. "समकालीन रामदासांनी (एकेरी उल्लेख नाही) जगाचे मिथ्यत्व स्वतः पुरते खरे मानले;... स्वत: ते (एकेरी उल्लेख नाही) विरागी होते (एकेरी उल्लेख नाही); पण त्यांनी (एकेरी उल्लेख नाही) अख्ख्या महाराष्ट्राचा संसार केला. 'तर्क तो अर्क जाणावा' असा संदेश देणारे (एकेरी उल्लेख नाही) रामदास म्हणजे प्रपंचविन्मुखता आणि प्रपंचशूरता यांचा अत्यंत मनोज़ मिलाफ " एकेरी उल्लेख केला जाणाऱ्यांच्या यादीत यास्मिन शेख रामदास, तुकाराम, शिवाजी यांचा एकत्र उल्लेख करतात आणि 'ऐतिहासिक काळात जमा झालेल्या व्यक्ती' असा त्यांचा सामाईक गट करतात. प्रत्यक्ष उद्धरणात मात्र या 'ऐतिहासिक काळात जमा झालेल्या व्यक्ती पैकी तुकाराम आणि शिवाजी यांचा एकेरी उल्लेख येतो, पण रामदासांचा मात्र एकदाही एकेरी उल्लेख येत नाही. ४९४ निवडक अंतर्नाद तुकाराम आणि शिवाजी यांचा उपमर्द करण्याचा माटे यांचा हेतू होता, असे कोणीही म्हणणार नाही. उलट या दोन्ही महान व्यक्तींचा यथोचित गौरवच त्यांनी केलेला आहे तथापि माटे यांच्यासारखा विचक्षक, उदारमतवादी व प्रगतिशील लेखकाच्या मानसिकतेचे एक अंग कसे (त्यांच्याही नकळत) पारंपरिक धारणेने घडविलेले असते, हे मात्र यातून उघडकीस येते आणि उत्कट गुरुभक्तीच्या प्रभावाने काही गोष्टी यास्मिन शेख यांनी विनाकारण सोप्या करून स्वीकारलेल्या आहेत आणि समर्थनाचा व्यर्थ खटाटोप केला आहे याची गंमत वाटते, * प्रा. डॉ. निशिकांत मिरजकर, दिल्ली विद्यापीठ (जुलै २००८) 'सागरास'ची जन्मकथा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधून सावरकर साहित्याचा वेध घेणारा डॉ. अरविंद गोडबोले यांचा लेख आपण मेच्या अंकात प्रसिद्ध केलात त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन! सावरकरांच्या जवळजवळ प्रत्येक साहित्यकृतीला आगळा इतिहास आहे. प्रसिद्ध गांधीवादी साहित्यिक आचार्य काका कालेलकर यांनी 'ही कविता मराठी भाषेचे लेणे म्हणून मराठीत कायमचे स्थान मिळवून बसली आहे', असा अभिप्राय (प्रतिभा, १५ जाने. १९३६) सावरकरांच्या ज्या कवितेसंबंधी दिला, ती 'सागरास ही कविता याचे उत्तम उदाहरण आहे. अक्रूर वृत्तातील ही कविता रचतानाच्या सावरकरांच्या करुणाजनक मन:स्थितीचे वर्णन 'अंतर्नाद'च्या वाचकांसमोर ठेवण्याचा मोह आवरत नाही. दि. १ जुलै १९०९ ला सावरकरांचे सहकारी मदनलाल धिंग्रा यांनी इंग्रज अधिकारी कर्झन वायलीचा लंडन येथे वध केला. या सर्व प्रकरणाचा सावरकरांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला. दि. २८ जुलैला वायुपालट म्हणून लंडनच्या दक्षिणेस ५० मैलांवरील ब्रायटनला समुद्रकिनारी असलेल्या विश्रामालयात ते राहावयास गेले. क्रांतिकार्यातील त्यांचे सहकारी निरंजन पाल (लाल-बाल-पाल या त्रिकुटातील बिपिनचंद्र पाल यांचा मुलगा) त्यांना आस्थेने तेथे भेटावयास जात. एके दिवशी ते दोघे समुद्रकिनारी फिरावयास गेले प्रा. श्री. म. माटे यांच्यावरील अंतर्नाद मार्च २००८ मधल्या माझ्या एका विद्यार्थिनीच्या दृष्टिकोनातून...' या लेखात रामदासांचा जो आदरार्थी अनेकवचनी उल्लेख आहे, त्याला मी (लेखिका) सर्वस्वी जबाबदार आहे. प्रा. माटे यांची विधाने उधृत करताना अनवधानाने माझ्याकडून झालेली ती चूक आहे. त्या चुकीबद्दल मी दिलगीर आहे. प्रा. माटे यांनी ऐतिहासिक काळातील त्या सर्वच संतांचा, राज्यकर्त्यांचा उल्लेख एकेरीच केला होता. या संदर्भात प्रा. श्री. म. माटे यांच्या 'साहित्यधारा' (प्रकाशनवर्ष १९४३) या पुस्तकातील 'पारमार्थिकांनी केलेला रामदासाचा पराभव (एकेरी उल्लेख) ' हा लेख अवश्य वाचावा. प्रा. माटे यांच्याबद्दल मला वाटणारी 'उत्कट गुरुभक्ती' त्यांच्या 'समर्थनाचा व्यर्थ खटाटोप करण्यास प्रवृत्त झाली, हा पत्रलेखकाचा निष्कर्ष सर्वस्वी अयोग्य आहे. प्रा. माटे यांनी ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा भेद कधीच मानला नाही. त्यामुळे पत्रलेखकाचा आरोप त्यांच्यावर अन्याय करणारा आहे व माझ्यावरही. यास्मिन शेख (जुलै २००८)