पान:निवडक अंतर्नाद.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गळी मला हे उतरवता आलं नाही. उठता बसता फुले, आंबेडकरांचा, ज्ञानेश्वरांचा जप करणाऱ्यांच्या राज्यात आपण मोकळेपणानं मनातले विचार मांडू शकत नाही, याचं मात्र मला मनापासून दुःखं होतंय. लेखासंदर्भातल्या सर्व पत्रांना मी उत्तरं दिली नाहीत हे खरं आहे कारण अनेक पत्रांतले मुद्दे गैरलागू असायचे. एका पत्रात माझ्या शारीरिक व्यंगावर टीका-टिपण्णी होती, तर दुसऱ्या एका पत्रात मी ज्या संस्थेत काम करतो, तिथलं माझं पद आणि योगदान काय याची विचारणा होती. याचा अर्थ मी कचेरीत चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी असेन तर मला कोणावर काही टीका-टिपण्णी करायचा अधिकार नाही. उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नाला बगल देणारे आक्षेप मी स्वीकारू शकत नाही, हे आत्मप्रौदीचा दोष स्वीकारून मला सांगायलाच हवं, काही विरोधी पत्रांत मात्र मुख्य मुद्द्यांवर विधायक चर्चा असायची. अशा पत्रांनी माझं निश्चितपणे प्रबोधन व्हायचं, हेही इथं नमूद केलं पाहिजे. पण एकुणातच 'अवधान' मधल्या मांडणीला 'अंतर्नाद' च्या वाचकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे, हे माझ्या, उशिरा का होईना, लक्षात येऊ लागलं. तेव्हा वाचकांना क्लेश देणारा हा प्रकार बंद करावा या विचारानं मी कदाचित या निर्णयाप्रत येऊन पोहोचलो असेन. दोन अफाट कादंबऱ्या लिहिलेल्या आणि त्यांना मिळालेल्या उदंड प्रतिसादातून वाचकवर्तुळात अफाट कीर्ती आणि सन्मान मिळण्याचं भाग्य लाभलेल्या आजच्या एका आघाडीच्या लेखिकेनं अलीकडे लेखन थांबवायचा निर्णय घेतला. 'यापुढे मी कोणाला चार ओळीचं पत्रही लिहिणार नाही; उद्या आत्महत्या केली तर बोटभर चिठ्ठीही लिहिणार नाही,' असं म्हणतेय आज ती. लेखनाचा इतका पराकोटीचा तिटकारा तिच्या मनात का निर्माण व्हावा? लिहिणं हा माझा श्वास बनून गेला आहे, असं बोलणारे एका बाजूला; आणि लिहिणं उच्छ्वासाप्रमाणे एका दमात सोडून देणारी ही लेखिका एका बाजूला. लेखन ही गोष्ट तिला एकाएकी बंडल वाटायला लागण्यामागची तिची कारणं काय हे तिचं तिला ठाऊक. आपण आपल्या बुद्धीनं केवळ त्यावर तर्कवितर्क लढवू शकतो. ज्या समाजात वाचन ही बिनमहत्त्वाची गोष्ट समजली जाते, ज्या समाजात ज्ञानपीठविजेत्या व्यक्तीपेक्षा टीव्ही मालिकेतला नवा कलाकार अधिक पैसा, प्रतिष्ठा मिळवून असतो, त्या समाजात कुणाही लेखकाला निराशेनं ग्रासलं तर नवल नाही. न वाचणाऱ्या समाजात लेखन हा मूठभरांनी खेळायचा गोल्फसारखाच खेळ ठरतो. गोल्फदेखील जास्ती लोक खेळतात, असं कोणी यावर म्हणायचा! आपली कादंबरी अफाट खपली हे खरं, पण ती वाचली किती जणांनी ? हा प्रश्न थोरामोठ्या लेखकांनाही सतावत असतो. एक हजाराची एक आवृत्ती म्हणजे पुस्तकाच्या एक हजार प्रती अशा पाच आवृत्त्या संपल्या, की आपल्याकडे लेखक- प्रकाशकांना अस्मान ठेंगणं होतं. नऊ कोटी लोकसंख्या असलेल्या मराठी भाषिक राज्यात प्रथितयश लेखकाच्या पुस्तकाच्या पाच-सहा हजार प्रती खपणं ही हुरळून जाण्याची घटना बनून जावी, ही गंमतच आहे. मला एका टीव्ही निर्मात्याची गोष्ट आठवते. "माझ्या कार्यक्रमाला छान रिस्पॉन्स मिळतो आहे," असं तो मला एकदा म्हणाला. मी म्हटलं, "हे रिस्पॉन्स वगैरे कसं ठरवता तुम्ही लोक ?" उत्तरादाखल त्यानं ड्रॉवर उघडून मला महिन्याभरात आलेली पत्रं दाखवली. एकूण आठ पत्रं होती, पण ती दाखवताना माझ्या निर्मात्या मित्राचा चेहरा भलता उत्तेजित झाला होता. दूरदर्शन पाहणारे पाच कोटी प्रेक्षक आणि कार्यक्रमाची प्रशंसा करणारी ही आठ पत्र, आपण फक्त दीर्घ श्वास सोडायचा. अनेक प्रसंगी सुस्कारा सोडण्यापलीकडे आपल्या हातात काही नसतं. मनाशी विचार केला तर एक कबूल करायला हवं, की माझ्या बाबतीत तरी लेखन हा श्वास बनून गेला आहे, अशी काही गोष्ट नाही. वाचण्याबद्दल विचाराल तर मात्र वेगळं उत्तर द्यावसं वाटेल. 'वाचणं' हा मात्र माझा श्वास बनून गेला आहे, असं मिरवायला मला आवडेल. वास्तविक लेखन ही जशी वेळखाऊ गोष्ट आहे, तशीच वाचन ही चांगल्यापैकी वेळखाऊ गोष्ट आहे. पण आपली आवडती गोष्ट करताना आपला वेळ वाया गेला असं कधीच वाटत नाही. 'लिहिणं' आणि 'जगणं यांतून एकाची निवड करायची असा प्रसंग ओढवला, तर जगण्याची निवड करणं नि:संशय शहाणपणाचं, मात्र 'जगणं' आणि 'वाचन करणं' यांतून एकाची निवड करायची वेळ आल्यास जगण्याला फार महत्त्व देऊ नये असं मी म्हणेन, वाचण्यासारखी अद्भुत गोष्ट नाही असं मला वाटतं. वाचनाचा माझा छंद बाजूला ठेवून विविध विषयांवर आपल्याला काय वाटतं हे सांगण्यात मी आयुष्याची आणि 'अंतर्नाद' ची बरीच पानं खर्च केली. लेख असो कादंबरी असो की कविता, सर्व प्रकारचं लिखाण हे विविध विषयांवरल्या आपल्या प्रतिक्रिया थेट किंवा अप्रत्यक्ष मांडणंच तर असतं. 'अवधान' आणि इतर तीन चार सदरांसाठी नियमित लिहिताना वाचणं हे लिहिण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे, हेच अवधान सुटलं. दोन लेखांच्या दरम्यान जो काही थोडा वेळ मिळायचा त्यात वाचन व्हायचं; नाही असं नाही. पण अनेकदा तेही लिखाणासाठी संदर्भ म्हणून केलं जायचं. वाचताना सदरांच्या तारखा सांभाळण्याची येचणी कायम असायची. बाहेरच्या दुनियेत उत्तमोत्तम सिनेमे प्रदर्शित झालेले असायचे. सिनेमहोत्सव चालू व्हायचे. नवनवी प्रायोगिक नाटकं घराजवळच्या नाट्यगृहात लागलेली असायची. पण सदरलेखनाच्या तणावामुळे नाटक-सिनेमाला फिरकता यायचं नाही. जगणंच थांबून गेल्यासारखं झालं. संपादकांची भेट होताच स्पष्टपणे त्यांना हे दैनंदिन ताण- तणाव सांगून टाकले. एकीकडे 'अवधान' सारखं सदर लिहिताना निवडक अंतर्नाद ● ४९