पान:निवडक अंतर्नाद.pdf/५००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनियमित झाले होते, म्हणून लगेच सिझेरिअन ऑपरेशन केले. गावातील ज्या डॉक्टरांनी प्रसूतीचा आधी प्रयत्न केला होता, ते स्वतः सोबत आले होते. बाळाची अवस्था गंभीरच होती. चार दिवसांनी ते दगावले. नंतर लगेच माहिती मिळाली, की नातेवाइकांनी गावाच्या त्या डॉक्टरांवर पोलीस केस केली, की त्यांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठविण्यास उशीर केला, म्हणून बाळ दगावले. आम्ही तपशीलवार चौकशी केली, तेव्हा पूर्ण सत्य समजले. १. सदर महिलेस सासरी आठ महिने होईपर्यंत कोठेही प्रसूतिपूर्व दाखवले नव्हते, २. सरकारी व्यवस्थेतून फक्त दोन T.T. Inj. दिली होती. संबंधित गावाच्या डॉक्टरांकडे कळा सुरू झाल्यावर आणले ऐनवेळी. ३. ४. बाळंतपणाला वेळ लागू लागला, तेव्हा संबंधित डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले तर नातेवाइकांनी: 'होती हो - इथेच बघा, भारी इंजेक्शन द्या', हा आग्रह धरून भरपूर कालापव्यय केला. शेवटी रुग्णाला हलवले. ५. अर्भकाचा मृत्यू झाल्यावर संबंधित गावातील डॉक्टरांवर केस करण्याची धमकी देऊन एक लाख रुपये मागितले डॉक्टर सहजी दाद देईनात, म्हणून पोलीस केस केली, वरील सर्व गोष्टींची आम्ही शहानिशा केली. आता बोला! असो. तरीही जसे असावे असे वाटते, तसे वागण्याचा करण्याचा प्रयत्न कोणीतरी केला पाहिजे. ते आम्ही असावे. Charity begins at (my) home! सदर अंक आमच्या रुग्णालयातील सर्वांना वाचण्यास आम्ही उद्युक्त केले आहे. डॉ. अशोक ल. कुकडे, विवेकानंद रुग्णालय, लातूर (दिवाळी २०१०) हळुवार विश्लेषण आपला बंग दांपत्यावरचा लेख वाचला (ऑक्टोबर २०१०). आपण फार हळुवारपणे त्यांच्या कार्याचे विश्लेषण केले आहे. त्यांचा योग्य तिथे गौरव केलेला आहे, त्याचप्रमाणे काही अवघड मुद्द्यांनाही हात घातला आहे. अर्थात टोकाची विधाने किंवा अलंकारिक भाषा न वापरण्याचा संयम तुम्ही पाळता मला हा तुमच्या लेखनाचा सर्वांत महत्त्वाचा पैलू वाटतो, स्टॅम्प पेपर घोटाळा व 'महात्मा' लोकांचे संदर्भ फार आवडले. त्याचप्रमाणे 'बंग यांच्यानंतर कोण' (त्यांच्या संस्थेत आणि इतरत्रही!) या अवघड प्रश्नाला तुम्ही स्पर्श केला आहे, हे महत्त्वाचे वाटते. हल्ली, जोरजोराने बोलले किंवा समर्थकांची गर्दी उभी केली, की आपला मुद्दा बरोबर, हा न्याय आहे! त्या कोलाहलात निदान आपले वाचकतरी आपली ही सूक्ष्म निरीक्षणे लक्षपूर्वक वाचतील अशी आशा आहे रखी गोडबोले, अटलांटा, युएसए (जानेवारी २०११) भारावून टाकणारा वाचक प्रतिसाद अंतर्नादमध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या लेखास वाचकांकडून फोन आणि एसएमएसने सतत मिळत असलेल्या प्रतिक्रिया खूप सुखावून जात आहेत. बेळगावपासून नागपूरपर्यंतचा अंतर्नादचा वाचक अत्यंत प्रेमाने व आपुलकीने फोन करतो, लेख आवडल्याची मनापासून पावती देतो, याचे कौतुक वाटते, गेल्या वीस वर्षांपासून लेखन करतोय मी, पण असा आणि इतका प्रतिसाद मला पूर्वी कधीच मिळाला नव्हता, प्रतिसाद संख्येने तर प्रचंड होताच, पण त्या मागच्या भावनाही अत्यंत उत्कट असल्याचे सातत्याने जाणवत होते. माझ्यासारख्या अतिसामान्य लेखकास मात्र या प्रतिसादामुळे भारावल्यागत झाले आहे. मुख्य म्हणजे पुण्याच्या वाचकांबद्दल जो गैरसमज आतापर्यंत होता, तो या प्रतिक्रियांनंतर पार पुसून निघाला. पत्रासवर फोन पुण्याहूनच आले. बहुतेकांनी सुरुवात "मी पुणेकर असलो/असले तरी..." अशी केली. एक वयस्कर आवाजाच्या बाई तर "माझं माहेर ग्वाल्हेरचं व तुमचा लेख वाचून माहेरची खूप आठवण येते आहे, असे म्हणत फोनवर रडायला लागल्या, काय बोलणार? 'पुण्याला/मुंबईला/अमरावतीला/बेळगावला आलात की घरी अवश्य या', असा प्रेमळ आग्रहही बऱ्याच जणांनी केलेला आहे वाचकांकडून होणारे हे कौतुक लेखकाच्या भविष्यासाठी फार मोठा साठा असतो, हे मी काय सांगावे? अंतर्नादच्या सर्व खाद्यप्रेमी वाचकांस मी इंदौरला माझ्याकडे येण्याचे आग्रहपूर्वक निमंत्रण या पत्राद्वारे देत आहे. श्रीकांत तारे, इंदोर (एप्रिल २०११) अंतर्नादकडून अपेक्षाभंग 'म.टा. चे दिवस' म्हणता मोठ्या अपेक्षेने वाचायला घेतलेल्या मृण्मयी रानडे यांच्या लेखाने अपेक्षाभंग केला, फुटकळ आठवणी विस्कळीतपणे लिहिल्यासारख्या वाटल्या. यांतील तळवलकर, केतकर इत्यादी काही नावे वगळल्यास हा कोणत्याही चाकरमान्याच्या आठवणींचा लेख होऊ शकेल. दत्तप्रसाद दाभोळकरांचा ४२च्या चळवळीवरचा लेख (फेब्रुवारी अंक) खरे तर एका पुस्तकाचा ऐवज आहे. त्यांनी ते मनावर घ्यावे. आहे त्या स्वरूपात हा लेख मुख्य प्रवाहातील एखाद्या दैनिकात येणेही जरूर आहे. हेमंत गोविंद जोगळेकर 'पुन्हा कविता' घेऊन आले, म्हणजे आमच्या दृष्टीने अंतर्नादची चार पाने बाद झाली. अवधूत परळकरांच्या 'अनवधाना'ने आधीच चार पाने बाद झाली होती, असो, हे चालायचेच. राजेंद्र करंबेळकर, पुणे (एप्रिल २०११) भेण्डे यांचे आणखी एक आगळेपण आपण 'अंतर्नाद'च्या फेब्रुवारीच्या अंकात के. सुभाष भेण्डे यांना उचित श्रद्धांजली वाहिली आहे. ते अतिशय उमदे व निवडक अंतर्नाद ४९९