पान:निवडक अंतर्नाद.pdf/५०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जिव्हाळा व आपुलकी यांची खात्री पटविणारा, माहितीपूर्ण आणि पुन:पुन्हा वाचावा असे वाटणारा आहे. शं.वा. किं. ची कन्या व मुकुंदाची बहीण म्हणून आपल्या लेखाने मला वाटणारी कृतज्ञता आपल्यापर्यंत पोहोचवावी म्हणून हे पत्र, मुकुंदावर अनेक लेख, अग्रलेख वाचले. आपला, दशरथ पारेकरांचा, गाडगीळांचा, नरेंद्र चपळगावकरांचा असे काही लेख मी फोटोकॉपी करून ठेवले आहेत. 'अंतर्नाद'चे मराठी साहित्यजगात एक वैशिष्ट्यपूर्ण, मोलाचे, मानाचे स्थान आहे त्यामुळे त्यात आलेल्या या भावोत्कट लेखाचे महत्त्वही आगळेच आहे. पुन्हा एकवार अंत:करणापासून आपल्या लेखाबद्दल मी ऋणी आहे असे म्हणते. आपण माझी भावना समजून घ्याल असा विश्वास आहे मालती शं. किर्लोस्कर, सांगली (ऑगस्ट २०१३) आनंदवनातले मुकुंदराव आठवले आत्ताच मे २०१३चा अंतर्नाद हाती आला. आपण लिहिलेले के. श्री. मुकुंदराव किर्लोस्करांवरील संपादकीय अतिशय आवडले. आनंदवनातही ते वारंवार येत. त्यामुळे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा परिचय वाचनात येताच त्या आठवणी जाग्या झाल्या, एक विशेष आठवण म्हणजे आमच्या लग्नात, माझे वडील कै. ती. भाऊसाहेब वैशंपायन व कै. पू. बाबा या व्याह्यांचा त्यांनी काढलेला फोटो. त्यांनी तो कधी काढला कुणास ठाऊक, पण लग्नानंतर आठवड्याच्या आतच तो माझ्या पत्त्यावर आला व माझी दुर्मिळ ठेव बनला, इतका आनंद त्यामुळे मिळाला, माझ्या वडिलांवर स. भु. शिक्षण संस्थेने आता जो विशेषांक काढला आहे त्यात हा अनमोल फोटो देता आला. जर आज कै. मुकुंदराव असते तर हा आनंद त्यांच्याबरोबर वाटून घेता आला असता. उत्तम कविता व तिचे रसग्रहण हे सदर पुन्हा सुरू केले आहे. तेही आवडते. नित्यनूतन आनंदवन व हेमलकसा तिसरी पिढी कशी चालवीत आहे हे बघण्यास पुन्हा एकदा यावे. डॉ. भारती विकास आमटे, वरोरा, जि. चंद्रपूर ४४२९१४ (ऑगस्ट २०१३) पारशांची खासियत आणि इतरांचेही दातृत्व मार्च अंतर्नादमधील तीन पारशी व्यक्तींच्या चरित्रकथा अप्रतिम आहेत. ती नुसती चरित्रे नाहीत, किंबहुना, ती पारंपरिक पद्धतीची चरित्रे नाहीतच, त्यांना पारशांच्या आठवणींच्या किंवा आठवणीतल्या पारशांच्या स्मरणकथाही म्हणता येईल. कारण त्या व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्वांविषयी लिहिताना लेखकाने तो काळ, त्यांनी उभ्या केलेल्या संस्था, त्यांची जडणघडण कथाकथनाच्या अंगाने लिहिली आहे एवढे करूनही मला आवडलेली गोष्ट म्हणजे ते कथन एकांगी वाटत नाही. पारशांचे गुणधर्म जसे असतात, स्पष्ट दिसतात, तसेच त्यांनी त्यांचा विक्षिप्त स्वभावही दाखवला आहे. सामान्यपणे पारशी सरळ, सखोल आणि न्यायी. त्याचप्रमाणे उथळपणा आणि अन्यायाच्या विरोधात पूर्वी पुणे-मुंबई जलदगती मार्ग झाला नव्हता तेव्हा तळेगावचे पोलीस विनाकारण वाहतूक कोंडी, खोळंबा करीत, तेव्हा एका संध्याकाळी सर्व मोटारी रांगेने ५०२ • निवडक अंतर्नाद पहिल्या दुसऱ्या गीअरमध्ये चालल्या होत्या. एका महागड्या गाडीचा बेशिस्त चालक रांगेत घुसण्याचा प्रयत्न करीत होता. माझ्या पुढचा वयस्क पारशी गाडीवाला त्याला घुसू देत नव्हता; त्याने शेवटी खुशाल त्या चकचकीत गाडीला चेपले, त्यात पारशाच्या फियाटलापण लागले. पारशाच्या बाजूने भांडायला मी उभा राहिलो, पण चुकीच्या मार्गाने पुढे रेटणारी गाडी चेपण्याएवढी हिंमत माझ्यात नव्हती आणि ती पारशाची खासियत होती. लेखात शेवटी के भालचंद्र BG देशमुखांच्या दानशूरपणाचा उल्लेख आहे. माझाही अनुभव असाच आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणाऱ्या एका संस्थेचा मी अध्यक्ष होतो, आमच्या संस्थेतर्फे डॉ. सी. डी. देशमुखांचे टपाल तिकीट निघावे म्हणून आम्ही प्रयत्न करीत होतो. खूप खटाटोप केल्यावर श्री. मनोहर जोशी व श्री. अरुण शौरी यांच्या मदतीने ते तिकीट प्रसृत झाले, बी. जी. देशमुख तेव्हा उपस्थित होते. काही दिवसांनी आमच्या संस्थेच्या व्यवस्थापकाचा उन्मादित झाल्यासारखा फोन आला, की साध्या टपालाने रु १५ लाखाचा एक चेक संस्थेकडे आला आहे. मी त्याला म्हटले, "अहो १५ हजाराचा असेल, पुढची पैशाची शून्ये तुम्ही मोजता आहात!" पण तो खरोखर १५ लाख रुपयांचाच चेक होता. भालचंद्र देशमुखांचा त्या रकमेची पावती, 80Gचे सर्टिफिकेट व पुष्पगुच्छ व्यक्तिशः पुण्यात त्यांच्या घरी नेऊन देण्यासाठी मी त्यांची भेट फोनवर मागितली तर "उगीच खर्च करू नका, पावती- सर्टिफिकेट पोस्टाने पाठवा," असे सांगून त्यांनी संवाद संपवला. सुहास मोकाशी, दादर (पश्चिम), मुंबई (सप्टेंबर २०१३) किर्लोस्कर मासिकाचे योगदान अंतर्नाद मे २०१३ मधला संपादकीय लेख आनंद देणारा होता. सुरुवातीपासूनच आमचे वडील किर्लोस्करचे वर्गणीदार होते, वयाच्या आठ-नऊ वर्षांपासून प्रत्येक महिन्याला १ तारखेनंतर मी किर्लोस्करची उत्कंठतेने वाट पाहायचो. मराठी अभिजन, सुसंस्कृत घरांमधील, का. रा. मित्रांच्या 'मनोरंजन'च्या अस्तानंतर निर्माण झालेली दरी किर्लोस्करने भरून काढली होती. मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत जाहिरातीसकट (आणि त्या पुष्कळच असायच्या) सर्व मजकूर वाचून काढणे हा बहुतेकांचा छंद असायचा. 'दरमहा एका महापुरुषाला हुडकून काढणारे मासिक' अशी हेटाळणी काही टीकाकार करत असले, तरी शेवटपर्यंत सुरुवातीचा लेख म्हणजे मोठ्यामोठ्यांची व्यक्तिचित्रे असायची आणि तो आवडीने वाचल्याशिवाय आम्ही कधीही पुढे गेलेलो नाही. नंतर ख्यातकीर्त झालेल्या अनेक व्यक्तींचा शोध किर्लोस्करने अगोदरच घेतलेला असायचा. याखेरीज बाकीचाही मजकूर चित्तवेधक असायचा. वि. सी. गुर्जर, ग. ल. ठोकळ, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर यांच्या चटकदार लघुकथा माझी आठवण बरोबर असेल तर खांडेकर आणि फडके यांच्या कादंबऱ्यांची क्रमशः प्रसिद्ध होणारी प्रकरणे पुढे काय होते याची उत्सुकता जागवत ठेवायची, ना. धों, ताम्हनकरांची 'दाजी' ही हास्यमाला अप्रतिम होती, लेखांसोबत