पान:निवडक अंतर्नाद.pdf/५०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विकास खात्याने या कार्यक्रमात काहीच रस दाखवला नाही. पण यात गोवारीकरांचा काहीच दोष नव्हता, माझ्या पुणे विद्यापीठातील ३०-३५ वर्षांत कुलगुरूंनी संशोधनात रस घेण्याचा व हातभार लावण्याचा हा अनुभव अद्वितीय होता, प्रा. अनिल गोरे, सोपानबाग, पुणे (मार्च २०१६ ) कर्मवीर भाऊराव आणि ग. दि. माडगूळकर ही साधारण १९४८ सालची घटना, कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांचे शिक्षक व विद्यार्थी सातारा येथील गांधी टेकडी फोडून संस्थेच्या शैक्षणिक संकुलासाठी जागा सपाट करत होते. त्याचवेळी शेजारूनच चाललेल्या एसटी बसमधील ग. दि. माडगूळकर यांनी ते दृश्य बघितले. गदिमा इतके भारावून गेले, की लगेच मोती चौकात ते एसटीतून उतरले व टांगा पकडून माघारी आले. एका बाभळीच्या झाडाखाली त्यावेळी कर्मवीरांशेजारी बसून गदिमांनी थोडी चर्चा केली. भर उन्हात घाम गाळत शिक्षक व विद्यार्थी आणि स्वतः कर्मवीरही करत असलेले ते काम विलक्षण स्फूर्तिदायक होते. रयतेला, कष्टकऱ्याला, बहुजनसमाजाला, श्रमिकाला प्रतिष्ठा मिळवून देणारे 'कमवा व शिका' पद्धतीचे, श्रमाची प्रतिष्ठा जागवणारे ते काम पाहून शीघ्रकवी ग.दि.मां. ना कर्मवीर अण्णांसोबत गांधी टेकडी, सातारा येथे झाडाखाली बसून स्फुरलेले काव्य : श्रमाची प्रतिष्ठा नसे राऊळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी ॥ध्रु.॥ जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम तिथे अत्र होऊन ठाकेल श्याम दिसे सावळे रूप त्याचे शिवारी जिथे राबती हात तेथे हरी ॥१॥ नको मंत्र त्याला मुनी ब्राह्मणांचे तया आवडे गीत श्वासा- घणांचे वसे तो सदा स्वेदगंगे किनारी जिथे राबती हात तेथे हरी ॥२॥ शिळा फोडती संघ पाथरवटांचे कुणी कापसा रूप देती पटांचे तयांच्या घरी नांदतो तो मुरारी जिथे राबती हात तेथे हरी ॥३॥ जिथे काम तेथे उभा श्याम आहे नव्हे घर्म रे धर्म ते रूप पाहे असे विश्वकर्मा श्रमाचा पुजारी जिथे राबती हात तेथे हरी ॥४॥ सुभाष पाटील, विश्रामबाग, सांगली (मार्च २०१६ ) लेखकांना दिलासा देणारा प्रतिसाद गतवर्षी आपण आयोजित केलेल्या दि. बा. मोकाशी कथास्पर्धेसाठी पाठविलेल्या माझ्या 'टँकर' या कथेला आपण प्रथम पुरस्कार जाहीर केलात. त्याचा निश्चित आनंद आहे. पण या कथापुरस्काराने माझ्या आयुष्याला एक आनंदमय वळण मिळाले. या कथेसाठी गेल्या चार-पाच महिन्यांत मला महाराष्ट्रातून अभिनंदनाचे जवळपास शंभरएक फोन आले. त्यामुळे मी बऱ्यापैकी कथा लिहू शकते, हा नवा शोध मला लागला. अन्यथा आजवर ४० वर्षे मी कवितेत रमले होते. माझी थोडीफार ओळख असली तर ती एक कवयित्री म्हणूनच आहे परंतु या पुरस्काराने मला अभिव्यक्तीची एक नवी वाट सापडली. याचे सर्व श्रेय आपण देऊ केलेल्या पुरस्काराला आहे. खरे तर या पुरस्कारापूर्वी आपली कोणती ओळख नव्हती, साहित्यक्षेत्रातही माझी ओळख नव्हती, परंतु आपण व कथास्पर्धेच्या निवड समितीने अतिशय निःस्पृहपणे या पुरस्कार व्यवहाराकडे पाहिले आणि साहित्य प्रांतातही भ्रष्टाचार माजला असताना या क्षेत्रात आजही अभिरुचिसंपत्र आणि न्याय्यवृत्तीने साहित्याचे मूल्यमापन करणारी माणसे अस्तित्वात आहेत याचा विश्वास दिलात, हा विश्वास आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तळमळीने साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांना दिलासा देईल अशी मला खात्री वाटते, विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे ही कथा वाचल्यानंतर एका चित्र निर्मात्याने माझ्याशी संपर्क करून या कथेवर लघुपट काढण्याची इच्छा व्यक्त केली आणि सध्या त्या कथेच्या लघुपटाचे काम सुरू आहे. बी सुपीक जमिनीत पडले की किती जोमाने झाड वाढते याचे हे उत्तम उदाहरण आहे तेव्हा मनापासून आभार, अंतर्नादच्या परिवाराशी जोडून घेणे ही माझ्या आनंदाची गोष्ट आहे. छाया कोरेगांवकर, बदलापूर (पूर्व ) (जून २०१६) अच्युतराव आणि इंदिरा गांधी न्या. नरेन्द्र चपळगावकर यांचा अच्युतराव पटवर्धन यांच्यावरील लेख वाचून पूर्वी न लिहिलेले असे काहीतरी लिहावेसे वाटले व म्हणून हे पत्र, राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर सगळे सार्वजनिक समारंभ आणि प्रसिद्धी यांपासून ते कटाक्षाने दूर राहिले होते व फक्त आध्यात्मिक साधनाच करण्यात आयुष्य व्यतीत करत होते. त्यावेळी मिरज येथे त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्याशी गप्पा मारायचा एक दुर्मिळ योग तेथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात घडवून आणला होता. त्याचा वृत्तान्त एक पत्रकार या नात्याने मी त्यावेळी लिहिला होता, पण त्यातून काही भाग वगळला होता. आता तो लिहायला हरकत नसावी. अच्युतरावांशी झालेल्या या संवादाच्या शेवटी औत्सुक्य म्हणून आणि त्यांच्या परवानगीने मी त्यांना एक व्यक्तिगत स्वरूपाचा प्रश्न विचारला होता. नेहरू कुटुंबीयांशी रावसाहेब व अच्युतराव यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते, हे सर्वश्रुत होते, या पार्श्वभूमीवर अच्युतजी व इंदिराजी यांचे लग्न व्हावे असे निवडक अंतर्नाद •५०५