पान:निवडक अंतर्नाद.pdf/५१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतर्नाद २९ जुलै १९९५. अंतर्नाद मासिकाचा पुण्यातील शुभारंभ. ऑगस्ट महिन्याच्या त्या प्रथमांकाचे प्रकाशन करताना डॉक्टर आनंद यादव. त्यांच्या एका बाजूला समारंभाध्यक्ष शान्ता शेळके व मुकुंदराव किर्लोस्कर आणि दुसऱ्या बाजूला संपादक-प्रकाशक भानू काळे, किर्लोस्कर, स्त्री व मनोहर यांचे चाळीस वर्षांहून अधिक काळ संपादन केलेल्या किर्लोस्कर यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे पुढे येऊन भाषण केले होते. उजवीकडे वर्षा काळे. चोखंदळ वाचकांसाठी एक दर्जेदार मासिक स्मरणयात्रा LE PAGU ऊर्मी वाचनालय, नियोशी पार्क, औंध, पुणे इथूनच 'अंतर्नाद' मासिकाची सुरुवात झाली. छायाचित्रात स्नेहा अवसरीकर व वर्षा काळे. अंतर्नाद चोखंदळ वाचकांसाठी एक दर्जेदार मासिक १ जुलै १९९९. महाकवी कालिदास विशेषांकाचे प्रकाशन शान्ता शेळके यांच्या हस्ते पुण्यातील महात्मा फुले सभागृहात झाले. आपले अध्यक्षीय भाषण करताना प्रा. वसंत बापट. (डावीकडून अनुक्रमे संपादक, बापट, शेळके, प्रा. लीला अर्जुनवाडकर आणि वर्षा काळे) अर्जुनवाडकर यांचे 'कालिदास : रसिकांच्या मर्मबंधातली ठेव' हे भाषण रसिकांना विशेष आवडले होते. वीज गेलेली असतानाही अतिशय शांत राहून श्रोत्यांनी ते एकाग्रतेने ऐकले. या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती पंडित अरविंद गजेंद्रगडकर यांच्या सुरेल बासरीवादनाने. निवडक अंतर्नाद १