पान:निवडक अंतर्नाद.pdf/५१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंतर्नाद स्कृतिक समृी ९ व १० जून २००७, अंतर्नादतर्फे दोन दिवसांचे कथामंथन शिबीर आयोजित केले गेले. बीजभाषण मधु मंगेश कर्णिक यांनी केले (उजवीकडचे छायाचित्र), तर समारोप केला डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालक होते संजय भास्कर जोशी. शिबिरात सुबोध जावडेकर आणि मोनिका गजेंद्रगडकर यांच्या त्यांच्या कथाप्रवासाविषयी मुलाखती झाल्या. दीपप्रज्वलन करताना (डावीकडून) कर्णिक, कुलकर्णी आणि आनंद अंतरकर. अतनाद सांस्कृतिक समृद्धीसाठी अंतर्नाद सांस्कृतिक समृद्धीसाठी ओम नम सो अ २५ सप्टेंबर २००९. शरद जोशी विशेषांकाचे पुण्याच्या एसेम जोशी सभागृहातील प्रकाशन. त्यावेळी जोशी यांची मुलाखत घेताना साप्ताहिक सकाळचे संपादक सदा डुम्बरे (उजवीकडे). याच कार्यक्रमात भानू काळे यांच्या 'अंतरीचे धावे...' या अंतर्नादमध्ये प्रकाशित लेखांच्या संकलनाचेही प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी होते रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे. या प्रसंगी पुस्तकाविषयी भाषण करताना एम.के.सी.एल. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत (डावीकडे). मौज प्रकाशनचे संजय भागवत यांचेही यावेळी भाषण झाले. तरुण कवी व संगीतकार आशुतोष जावडेकर यांनी सूत्रसंचालन केले. अस.अम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन नानासाहेब गोरे अकादमी दि. बा. मोकाशी जन्मशताब्दीनिमित्ताने अंतर्नादने मोकाशी कुटुंबियांच्या पुढाकारातून कथास्पर्धा आयोजित केली होती. देश-विदेशातून तब्बल ३१६ कथा स्पर्धेसाठी आल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्यांना २७ नोव्हेंबर २०१५ रोजी ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांच्या हस्ते पुरस्कार दिले गेले. प्रथम पुरस्कार स्वीकारताना छाया कोरेगांवकर (डावीकडे). दिबांच्या कन्या ज्योती कानिटकर यांनी वडिलांच्या आठवणी सांगितल्या तर जावई डॉ. अजित कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले. आपली काही निरीक्षणे मांडताना मुख्य परीक्षक मोनिका गजेंद्रगडकर (उजवीकडे). निवडक अंतर्नाद ३