पान:निवडक अंतर्नाद.pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणून नाकारला. तेंडुलकरांनी भाकित केल्याप्रमाणे कवितेच्या पहिल्या ओळीने त्यांचा रोख भलतीकडेच वळला असावा, असो! मर्ढेकर आपल्या कवितांना शीर्षके देत नसत. बऱ्याचदा त्यांच्या कवितेची पहिली ओळ थेट विषयाला हात घालत असे. असभ्य समजले जाणारे उल्लेख कवितेच्या पहिल्या ओळीत करायला ते जराही कचरत नसत. उदाहरणार्थ, बडवीत टिय । अर्धपोट किंवा १. २. ३. शिवलिंग माझे लिंग | हेच अशांतीचे बिंग संडासातिल घाण जिरावी बऱ्याचशा कवितांची शीर्षके वर्ण्य विषयाला / अनुभवाला कोण, कुठे, केव्हा, काय, कसे, का हे सहा क- प्रश्न करून सिद्ध झालेली असतात. व्यक्तिचित्र रेखाटणाऱ्या कविता ज्या कुणा व्यक्तीचे चित्र काढले आहे त्याच्या नावे असतात. उदाहरणार्थ, विंदा करंदीकरांची बकी किंवा धोंड्या न्हावी, नारायण सुर्व्यांच्या माझी आई, शीगवाला, वसंत बापटांच्या सकीना, सावंत, निरंजन उजगऱ्यांच्या माकडवाला, दहावीच्या बाई आणि अशा अनेकांच्या अनेक कविता, कधी कधी शीर्षक असलेल्या व्यक्तीचे कविता हे व्यक्तिचित्र नसते. पण कवितेतील व्यक्तींच्या दृष्टीने शीर्षक व्यक्ती महत्वाची असते. गुरुनाथ धुरींच्या 'ग्लोरिया' कवितेत तीन मेकॅनिक रात्री, लोकल गाडीत भान हरपून 'ओ ग्लोरिया' गाताहेत. आणि तिघांच्या हृदयांतील तीन ग्लोरिया मावळून तिघेही झालेत ग्लोरिया मग कवितेचे शीर्षक 'ग्लोरिया' होणे अपरिहार्य होऊन जाते. कधी कधी कवितेतील अनुभव कधी घेतला गेला आहे, ते कवीला महत्वाचे वाटते. दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांच्या एक उन्हाळी संध्याकाळ' कवितेत जे काही घडते, त्याला ती उन्हाळी संध्याकाळच कारणीभूत असावी, असे कवितेतल्या हडकुळ्या उंच स्मेनियन मुलीला वाटते. "ये, ये, ये!” ती पुटपुटत राहिली. माझ्या पाठीला ओरबाडत राहिली. पुष्कळ वेळानंतर, मी निघून जाताना तिनं उन्हाळ्यालाच सर्व दोष दिला. चित्र्यांच्याच एका कवितेचे नाव 'जुलाय १९५६ आहे वाचकांच्या दृष्टीने १९५६च्या जुलै महिन्याला काही महत्त्व नाही. पण कवितेच्या निवेदकाने 'जुलाय १९५६' मध्ये घेतलेला अनुभव त्याच्या दृष्टीने इतका महत्त्वाचा आहे, की तो महिना त्याच्या मनावर कोरला गेला आहे. म्हणूनच कवी तो महिना कवितेचे शीर्षक म्हणूनही कोरून ठेवतो. कधी कधी कविता कशाविषयी आहे किंवा काय सांगते, ते कवितेचे शीर्षक बनते, अनुराधा पोतदार 'माझं हरपलेलं आईपण' ५६ निवडक अंतर्नाद लिहितात, द. भा. धामणस्कर 'हस्तांतर' लिहितात आणि कुसुमाग्रज 'स्वप्नाची समाप्ती', पण 'स्वप्नाची समाप्ती' या रक्ष नावापेक्षा रसिकांच्या स्मरणात राहतात त्या कवितेतील काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात या भावात ओळी. द. भा. धामणस्करांच्या 'हस्तांतर' कवितेत निवेदकाच्या हातातली विसर्जनासाठी नेतानाची गणपतीची मूर्ती निवेदकाचा तरुण मुलगा आपल्या हातात घेतो. या हस्तांतरात परंपरा पुढे सरकते; पण मुलगा परंपरेच्या ओझ्याखाली वाकतो. हे ओझ्याचेही हस्तांतर 'हस्तांतर' हा कवितेत नसलेला शब्द सूचित करतो - कवितेचे शीर्षक बनून. कधी गोष्ट कशी घडते ते कवितेचे शीर्षक होते. शरच्चंद्र मुक्तिबोध 'सांज ये हळूहळू असे शीर्षक देतात. बा. भ. बोरकर 'क्षितिजि आले भरते ग' म्हणतात. भा. रा. तांबे 'सहज तुझी हालचाल' वर्णतात. पण सर्वात भावपूर्ण शीर्षक आठवते ते ना. वा. टिळक यांच्या कवितेचे - 'कुणास्तव कुणीतरी', कुणाची तरी कुणीतरी घरी वाट पाहत आहे. या दोघांच्या परस्परप्रेमाची ही साधी कौटुंबिक गोष्ट यातील नायक नायिकांचा उल्लेखही 'कुणीतरी' असा तिहाइ तासारखा आहे; पण त्यात प्रेयसीने प्रियकराला 'एक माणूस' म्हणावे तसा गोडवा आहे. आणि हे प्रेम व्यक्तिविशिष्ट नाही. त्याची सार्वत्रिकताही 'कुणीतरी' मधून जाणवते. कवितेचे हे मर्मच शीर्षकरूपाने कवितेच्या शिरावर ठेवलेले आहे क्वचितच काव्यविषयाचे किंवा कवितेचे कारण शीर्षकरूप धारण करते. ना. घ. देशपांडे त्यांच्या एका कवितेत जे सांगतात त्याचे कारण 'जीव तुझ्यात गुंतला' त्या कवितेचे शीर्षक म्हणून आले आहे. दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांच्या एका कवितेचे शीर्षक मोठे लांबलचक आहे. 'घरफोडी होऊन तुकारामांच्या गाथेची प्रत व इतर वस्तू चोरीस गेल्या ते समयी रचलेले अभंग, आदिस अबाबा १९६३ . हा प्रसंगच हे अभंग स्फुरण्याचे कारण आहे. या शीर्षकात केव्हा आणि कुठे हेही सांगितले आहे. अनेकदा 'कुठे' हे कवितांचे शीर्षक होते. दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांच्याच अनेक कवितांची, विशेषत: 'बर्फाचे दिवस या कवितासमुच्चयातील कवितांची शीर्षके अशी युरोपातील स्थळे आहेत. 'चित्रे यांचा वाडा, खारीबाव रोड बडोदे' हेही त्यांच्या एका कवितेचे शीर्षक आहे. गणेश विसपुते 'धुंवाधार गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध' नावाची कविता लिहितात आणि तेच नाव आपल्या कवितासंग्रहाला देतात. कधी काव्यविषयाचे स्थळ हे कवितेच्या निवेदकाला किंवा कवीला फार महत्वाचे वाटते, वसंत आबाजी डहाके यांची एक कविता आहे : शंकर लॉज, हिंगणघाट एखाद्या शहराच्या कपाळावर अखंड धूळ पडत राहावी तसली धूळ अंगावर घेऊन उभी असलेली डोक्यावरून पदर घेतल्यासारखी साधीसुधी इमारत,