पान:निवडक अंतर्नाद.pdf/५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणि किल्ली द्यावी ठेवून कवितेच्या डोक्यावर शीर्षक म्हणून. गुरुनाथ सामंतांची एक कविता आहे 'गुरुनाथ धुरी, कवितेतील तो म्हणजे गुरुनाथ धुरी हा प्रतिभावंत मनस्वी कवी आहे, हे शीर्षकावरून समजते आणि तिचा अर्थ उलगडतो. गुरुनाथ धुरींनीही 'वसंत आबाजी डहाकेसाठी' नावाची कविता लिहिली आहे. तिचा शेवट आहे : अखेर नुस्तं उरतं तें तुझ्या कवितांतलं सत्य : हाडं हाडं हाडं: डाके ! आणि वसंत आबाजी डहाके यांनी 'अमिताभ बच्चन' नावाची कविता अमिताभला उद्देशून लिहिली आहे. ती अमिताभ बच्चन या व्यक्तीविषयी नाही, पण कवितेच्या निवेदकाच्या सहा वर्षांच्या मुलीवर गारूड करणाऱ्या अमिताभच्या चित्रपटाच्या पडद्यावरील प्रतिमेला उद्देशून आहे. चित्रपटाच्या नायकावर आलेल्या संकटांनी मुलगी व्याकूळ होते तेव्हा निवेदक तिला सावरायचा प्रयत्न करतो. पण तो जाणून आहे की, त्यांत खरें तर कांही अर्थहि नसतो. ती स्वत:ची स्वतःच सावरते कांही वेळाने जसें तिला पुढे पुष्कळदा करायचें आहे आणि त्या वेळीं तूं खूपच मागे राहून गेलेला असशील, कथेमध्ये सुरुवातीसच पात्रपरिचय घडवून आणलेला असतो, कथेचे स्थळ, काळ, प्रसंग विस्ताराने स्पष्ट केलेला असतो. कवितेत हे करायला जागा नसते. पण कवितेचे शीर्षक आणि पहिल्या ओळींनी वाचकांना या गोष्टी आपोआप समजतात. नारायण सुर्व्यांच्या अनेक कविता वेगवेगळ्या पात्रांच्या नाट्यछटांसारख्या आहेत. पण त्यांच्या केवळ भाषेवरून पहिल्या काही ओळींतच हे कोण, कुणाला, कुठे सांगत आहे ते वाचकांना उमगते. कवितांची शीर्षके कधी कधी दिशाभूल करणारीही असतात. अनिलांची एक दशपदी आहे : 'आणीबाणी' आणीबाणी म्हटले की आता आपल्याला केवळ देशात पुकारण्यात येणारी आणीबाणीची स्थिती आठवते. या कवितेतील आणीबाणी ही निवेदकाची वैयक्तिक कठीण परिस्थिती आहे - जिचे वर्णन पहिल्या आठ ओळींत आहे. पण ते कवितेचे मर्म नाही, मर्म आहे शेवटच्या दोन ओळींत सांगितलेली या कठीण परिस्थितीतून निवेदकाला निभावून नेणारी हृद्य गोष्ट : कसे निभावून गेलो कळत नाही कळले नव्हते तसे काही जवळ नव्हते - नुसते हाती हात होते ! माझ्या 'कंसदमन' कवितेविषयी बोलताना एका समीक्षिकेने तिचे शीर्षक दिशाभूल करते असे म्हटले होते. पण ही दिशाभूल ५८ निवडक अंतर्नाद सहेतुक आहे. कंसदमन म्हटल्यावर आपल्याला कृष्णाने केलेला कंसवध आठवतो. पण ही कविता लेखनात वापरले जाणारे कंस, त्यांचे तऱ्हेवाईक उपयोग यांचा छडा लावते. शीर्षक करीत • असलेली दिशाभूल या कवितेच्या प्रकृतीशी सुसंगतच आहे. कवितेचे शीर्षक कधी कवितेला अधिक अर्थपूर्ण करते, कधी काव्यविषयाचे संदर्भ स्पष्ट करते, कधी कवितेचे मर्म अधोरेखित करते, कधी कवितेला नवे परिमाण देते. शाळकरी वयात निबंध कसा लिहावा हे शिकताना निबंधाची सुरुवात आकर्षक असली पाहिजे हे आपण घोकलेले असते. कवितेचे शीर्षक आणि सुरुवात • वाचकांना आकर्षित करू शकते. पण कवितेचा निर्ढावलेला वाचक कवितेची सुरुवात आकर्षक असली तरी आणि रुस, अनाकर्षक, दिशाभूल करणारी असली, तरीही कविता वाचतोच वाचतो, जी या लेखांकमालेची ही सुरुवात वाचूनदेखील तुम्ही ही संपूर्ण लेखनमाला वाचणार आहात! मी फक्त म्हणू शकतो रस्त्यावरच्या नगरपालिकांच्या पाट्यांइतके निर्विकार होऊन 'तुमचा प्रवास सुखाचा होवो आभारी आहोत.' उद्धृत कविता १) का हसतेस?: हेमंत गोविंद जोगळेकर, 'होड्या', २) शंकर लॉज, हिंगणघाट : वसंत आबाजी डहाके, 'शुन: शेप' ३) यापुढचं जीवन : द. भा. धामणस्कर, 'बरेच काही आवून आलेले. उद्धृत कवितांश : १) तिघांच्या हृदयांतील ग्लोरिया, गुरुनाथ धुरी, 'ग्लोरिया', २) “ये, ये, ये !”..., , एक उन्हाळी संध्याकाळ, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, 'एकूण कविता', ३) काढ सखे... स्वप्नाची समाप्ती कुसुमाग्रज, रसयात्रा, ४) मात्र कविता संपली..., कागद : हेमंत गोविंद जोगळेकर, 'तिसरा डोळा'.

५) अखेर नुस्तं उरतं... वसंत आबाजी डहाकेसाठी : गुरुनाथ धुरी, 'समुद्रकविता'. ६) त्यात खरे तर ...... अमिताभ बच्चन : वसंत आबाजी डहाके, 'शुभवर्तमान', 7 ७) कसे निभावून गेलो..., आणीबाणी : अनिल, 'दशपदी'. ८) मी फक्त म्हणू..., व्यवहार हेमंत गोविंद जोगळेकर, 'मनातले घर'. (फेब्रुवारी २०१३)