पान:निवडक अंतर्नाद.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असा अमेरिका सोडायचा निर्णय कुणी घेऊ शकते याचेच हसू येते. शेवटी गुलामीतून मुक्तता झाली तरी ते सवयीचे गुलाम राहिले! रिचर्डला आपण अमेरिकन असल्याचा अभिमान आहे. तो त्याच्या आईवडिलांपेक्षा वेगळ्या अमेरिकेत जन्मला आहे. त्यामुळे त्याची युद्धेपण वेगळी असतील. एकेकाळी फक्त कृष्ण धवल असणारी अमेरिका आता जगातील सर्व वंशांचे कोलाज झालेली आहे – Not a melting pot but a beautiful salad bowl! अमेरिकेतील सगळेच आफ्रिकन लोक काही गुलाम म्हणून आलेले नाहीत. त्यातले अनेक आमच्यासारखे immigrants म्हणूनपण आलेले आहेत. त्यांचा बाज वेगळा असतो. त्यांच्या खांद्यावर गुलामगिरीच्या इतिहासाचे ओझे नसते. ते स्वत:ला इथल्या आफ्रिकन्सपेक्षा सुपिरियर समजतात. रिचर्डला अमेरिकेतील भारतीयांविषयी काय वाटते हे मला अजून ठरवता आलेले नाही. कारण बोलताना त्याने 'मिसिसिपी मसाला' या सिनेमाचा विषय काढला. त्यात एका आफ्रिकन- अमेरिकन मुलाचे एशिअन अमेरिकन मुलीशी प्रेमसंबंध दाखवले आहेत. तो कृष्णवर्णीय म्हणून तिचे आईवडील त्याला विरोध करतात. त्याच्या तोंडी तेव्हा एक वाक्य घातले आहे - तिच्या कुटुंबाला उद्देशून. "You think you are white!” या प्रश्नाला / विधानाला उत्तर देणे सोपे नाही. एकूण इमिग्रेशनविषयी मात्र रिचर्डचे मत अनुकूल आहे त्याचे एक, काहीसे छापील म्हणता येईल असे, उत्तर त्याने मला दिले – "इमिग्रंट्समुळे या देशात उत्तम मूल्ये येतात, देशाच्या व्यक्तिमत्त्वात मोलाची भर पडते. त्यांच्यामुळे समाजाची वीण घट्ट सभा संस्था शिक्षण सावरकरांनी नव्याने सुचवलेले वा जुने पण नव्याने प्रचलित केलेले काही मराठी शब्द चित्रपट चित्रपट, बोलपट, मूकपट, वृत्तपट, परिचयपट मुद्रण (ट्रेलर), पटकथा, दिग्दर्शक, नेपथ्य, मध्यंतर, चित्रण, बाह्यचित्रण, ध्वनिलेखन, ध्वनिमुद्रिका समास, जुलारी, उपमुद्रित (प्रुफ), बांधणी टपाल, दूरध्वनी (टेलिफोन), दूरमुद्रक (टेलिप्रिंटर ) टपाल ग्रंथ

प्रकट, प्रकट सभा, हस्तपत्रक (हॅण्डबिल), परिपत्रक (सर्क्युलर), ध्वनिक्षेपक, प्रतिवृत्त (रिपोर्ट), विसर्जन (बरखास्त) कार्यवाह, कोषाध्यक्ष, गणसंख्या (कोरम), आजीव, अभियान (मोहीम), विश्वस्त मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, प्रपाठक ( रीडर), प्रवाचक (लेक्चरर), प्रबोधिका (अॅकॅडमी), अध्यासन (चेअर), परीक्षक, ज्ञानशाखा (फॅकल्टी), प्रवेश, उपस्थित, उपस्थिती, कुमार, कुमारी, गणवेश, क्रीडांगण, उत्तीर्ण होते.” रिचर्डची स्वत:ची मूल्ये उच्च दर्जाची आहेत. तो सांगतो, की तो आणि त्याची आई पंथमुक्त (non-denominational) ख्रिश्चन आहेत. तो जीझसची शिकवण रोज आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. सर्वांना प्रेमाने आदराने व करुणेने वागवायचे ही ती शिकवण. त्याच्या हॉस्पिससाठी डॉक्टर, नर्सेस आणि इतर निवडताना तो धर्म किंवा वंशाला महत्व न देता व्यक्तीच्या गुणांना महत्व देतो. रिचर्डला स्त्रियांविषयी आदर आहे. त्याची करुणा फक्त अमेरिकेतील स्त्रियांसाठी नाही. महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी जे अॅनिमिया प्रोजेक्ट माझी संस्था (अक्षयभाषा) करते आहे, त्यासाठी त्याने घसघशीत अनुदान दिले आणि आम्ही दोघे वंश, लिंगभेद वगळून सारख्याच प्रकारचे लोक आहोत हे सिद्ध केले. ग्रंथभांडार (बुकडेपो), पुस्तकविक्रेता, नगर वाचनालय, ग्रंथपाल. त्याच्याशी बोलता बोलता आमच्यामधले साम्य मला जाणवायला लागले. शतकानुशतके बंधनात असलेल्या भारतीय स्त्रियांची मुक्त प्रतिनिधी मी अन् पिढ्यान्पिढ्या गुलामगिरीत असणाऱ्या वंशाचा मुक्त प्रतिनिधी तो! आमच्या दोघांच्याही स्वातंत्र्याला कारुण्याचे अस्तर ! अल्लाउद्दिनच्या गोष्टीतले पन्नास हबशी गुलाम आता मला जाचत नाहीत. तेतर कधीच मुक्त झाले आहेत. भविष्याभिमुख, सुजलाम सुफलाम, विज्ञानप्रिय, विद्वानसंग्रही अशा अमेरिकेच्या भूमीवर आम्ही आमच्या भूतकाळाची गाठोडी खाली ठेवतो आणि व्यवसायाबद्दल कारुण्यपूर्णतेने बोलू लागतो! (And we start talking business with compassion!) (जानेवारी २०१४) शासन

शस्त्रसंधी (आर्मिस्टिस), उपसंधी (टूस),

अंतिमोत्तर (अल्टिमेटम), कीलक राष्ट्र (बफर स्टेट), शिबिर, युद्धनौका, वायुदल, भूदल, नौदल, संचलन,

कार्यालय, सचिवालय, विधिमंडळ, संसद, लोकसभा, संसदपटू, विभाग, अर्थसंकल्प, संमत, सेवानिवृत्त, निवृत्तिवेतन, नगरपालिका, नगरसेवक (शेरीफ), महापालिका, महापौर राजसत्ता, पदच्युत, शिरगणना, देश, विदेश नभोवाणी, दूरदर्शन, हुतात्मा, क्रमांक, दिनांक, (डॉ. अरविंद सदाशिव गोडबोले यांच्याकडून प्राप्त) (मे २००८) निवडक अंतर्नाद ६१