पान:निवडक अंतर्नाद.pdf/६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाडांकडे पाह्यण्याची ही दृष्टी असावी. मला आठवते, माझ्या लहानपणी मी माझ्या मावशीच्या घरी उसगावला गेलो होतो. तिथे न्हाणीघरात चक्क झऱ्याचे पाणी माडाच्या पोकळ वाश्यावरून वळवले होते. गोव्यातील अनेक घरांत माड न कापता तसेच ठेवलेले मी पाहिले आहेत. आपल्या पूर्वजांनी घरे बांधताना झाडे कापली नाहीत, त्या झाडांभोवती घरे बांधली, लोकांनी झाडे कापू नये, म्हणून झाडांना देवत्व दिले. झाडांच्या राया देवराया झाल्या झाडांना भूतत्व दिले. झाडांवर वेताळ, म्हारू, देवचार, हापशी असतो अशा अंधश्रद्धा जाणीवपूर्वक पसरवल्या. त्यामुळे झाडांविषयी मानवी मनात एकाच वेळी आदर आणि गूढ निर्माण झाले. पुढे साहित्यिकांनी आणि चित्रकारांनी झाडांभोवती सौंदर्याची चौकट तयार केली. महाकवी वाल्मीकी, महर्षी व्यास, भास, भवभूती, कालीदास, रवींद्रनाथ सगळ्यांनी झाडांवर अतीव प्रेम केले. झाडांच्या जेवढ्या जवळ जावे, तेवढे झाड आपल्या अंतरंगांतले सेंद्रिय सौंदर्य तुम्हांला उघडून दाखवते. झाडांचे हे सुस्नात सौंदर्य, कोवळे, ताजे, टवटवीत सौंदर्य दर झाडागणिक वेगळे असते. माड माड हा कधीच एकटा नसतो. माड हे समूझने वाढणारे झाड आहे अरबी दर्याची गाज ऐकत खारा वारा आकंठ पीत समुद्रकिनाऱ्यावर समुद्रसन्मुख उभ्या असलेल्या माडांच्या बागा डौलाने उभ्या असतात किंवा हिरव्यागार भाताची मेर संपली की डोंगरउतार सुरू होण्यापूर्वी माडांची बाग दिमाखाने उभी असते. माडाला इतर झाडांप्रमाणे फांद्या नसतात, त्यांची मुळे जमिनीत खोलवर जातात. ह्या सुदृढ मुळांमुळे माड उंच वाढतो. माड कधीच काटकोनात जात नाही. तो लघुकोनात किंवा विशालकोनात वाढतो. विशिष्ट उंचीनंतर माडाला हिरव्यागार झावळ्या येतात. ह्या छत्रीसारख्या झावळ्या ही माडाची खरी शोभा असते. त्यामुळे माडाला त्याचे शाही, बादशाही, राजेशाही रूप लाभते. वर्षातून चार वेळा माडाला नारळाच्या भरगच्च पेंड्या येतात. गोव्यात काही माड रेला सूर काढण्यासाठी दिलेले असतात. पहाटेला कातारांचे सूर आळवत माडावर चढलेले रेंदेर हे किनारपट्टीवरील हमखास दिसणारे दृश्य असते. माडाच्या शाळ्यांचे पाणी अमृततुल्य असते. केरळ, कर्नाटक, गोवा ह्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जितके लोक राह्यतात तितकेच माड असावेत. दोन माड एकमेकांपासून विशिष्ट अंतरावर लावले पाहिजेत. ते एकमेकांपासून जवळ लावले तर त्यांना योग्य सूर्यप्रकाश, वारा मिळत नाही. आणि त्यामुळे त्यांना चांगले नारळ येत नाहीत. माडाला माणसांची संगत हवी असते, निर्जन जागी माडांना नारळ लागत नाहीत अशी नारळ बागायतदारांची ( अंध) श्रद्धा आहे. गोव्याच्या जेवणात नारळाच्या खोबऱ्याचा भरपूर उपयोग करतात. नारळाच्या तेलाचा (ज्याला खोबरेल म्हणतात) मासे तळण्यासाठी उपयोग केला जातो. खोबरेल तेलात तळलेले मासे अन्य तेलात तळलेल्या माशांपेक्षा अधिक रुचकर लागतात. गोव्यात नारळाचा रस, गूळ व अंडी यांपासून बेंबिंका नावाचे पक्वान्न ख्रिश्चन लोक नाताळच्या सणात बनवतात ते फारच स्वादिष्ट असते. माडापासून केलेल्या दारूला माडेल म्हणतात, माडाचे खोड (वांशे) आणि झावळ्या यांचा छतासाठी वापर केला जातो. माडाचा कोणताच भाग वाया जात नाही त्यामुळे माड हा गोव्याचा राज्यवृक्ष तर आहेच, शिवाय सर्व दृष्टीने तो कल्पवृक्ष आहे नारळाला हिंदू धर्मात खास धार्मिक स्थान आहे. म्हणूनच त्याला श्रीफल म्हणतात. पूर्वी देवापुढे नरबळी देऊन मानवी कवटी अणि रक्ताचा नैवेद्य दिला जाई. कवटीऐवजी नारळ आणि रक्ताऐवजी शेंदूर ही प्रथा पडली व नरबळी देणे बंद झाले, असा इतिहास आहे. त्यामुळे आज गोव्यात जत्रोत्सवांत विजयरथापुढे शेकडो शेंदूर लावलेले नारळ फोडले जातात. नारळ हे सुफलीकरणाचे (गर्भाचे) प्रतीकही मानले जाते, त्यामुळे सौभाग्यवतीची नारळाने ओटी भरली जाते. गोव्यात नारळाला रुपये दहा आधारभूत भाव आहे. नारळाचे भाव बदलत असतात. आज गोव्यात नारळाला घाऊक बारा रुपये व किरकोळ वीस रुपये दर आहे. पण केरळ, कर्नाटकात नारळाचे खूप उत्पादन झाले, तर नारळाचे भाव चार, पाच रुपयांपर्यंत कोसळतात. त्यावेळी आधारभूत भावाचा उपयोग होतो. काही बागायतदार नारळ सुकवून खोबरे करून ते विकतात. माडी पोफळीला (सुपारीच्या झाडाला) गोव्यात माडी हे छान नाव आहे. माडाचे हे स्त्रीलिंगी नाव पोफळीला फार शोभून दिसते. कारण माडाच्या बागेशेजारीच पोफळीचे म्हणजे माड्यांचे (माडीचे अनेकवचन माड्यो) कुळागर असते. कुळागर ही गोव्यातील बहुजन ग्रामस्थांनी शेकडो वर्षांपासून ग्रामीण गोव्यात रुजवलेली अभिनव कृषी संकल्पना आहे. कुळागर म्हणजे रांगेने लावलेली पोफळीची झाडे, त्यावर चढवलेल्या मिरीच्या वेली, त्यामधून झुळूझुळू वाहणारे पाण्याचे पाट आणि त्यापुढे लावलेले गावठी भाज्यांचे मळे कुळागराच्या जवळपासच झरा वाहत असतो. त्याचे निवळशंख, आरस्पानी पाणी कुळागारात पाटांनी खेळवलेले असते. वर माडी उंचच उंच वाढलेली असते. त्यावर हिरव्यागार पानांच्या मिऱ्यांच्या वेली चढवलेल्या असतात. माड्यांवर सुपारीचे घोस तर मिऱ्यांच्या वेलीवर काळ्या मिऱ्यांचे घोस लोंबत असतात. कुळागारात अखंड पाणी खेळत असल्यामुळे तिथली जमीन दूर्वांकुरांनी हिरवीगार झालेली असते. पावसात तिथे पिवळी, जांभळी, गुलाबी रानफुले फुलतात. कुळागराच्या अवतीभवतीच्या सुपीक पाणवठ जमिनीत वांगी, सात शिरांचे भेंडे, तांबडी भाजी, मुळे, घोसाळी, दुधी भोपळा असल्या गावठी भाज्यांचा मळा फुललेला असतो. अशा कुळागरात गेले, की श्रांत मन निवांत होते. आज सुपारीला १८० रुपये किलो भाव आहे तर मियांना ३५० रुपये भाव आहे. गावठी या विशेषणाला कोकणी भाषेत निवडक अंतर्नाद ६७