पान:निवडक अंतर्नाद.pdf/६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नकारात्मक छाया आहे, पण हे विशेषण भाज्यांना लावले की त्याला सकारात्मक अर्थ येतो आणि गावठी भाज्यांची किंमत वाढते. कुळागर हा गोव्यातील दर बागायतीचा आत्मा असतो. केळ बागायतीत असो, घराच्या मागीलदारातील परसात असो, केळी पाहिजेतच. हिरव्यागार पानांनी सालंकृत होणारी केळ हे निसर्गातले फार सुंदर झाड आहे. केळीचे खोड (ज्याला कोकणीत गभा म्हणतात) मोत्यासारखा तेजस्वी असतो. पूजेच्या वेळी केळीचा गभा कापून त्यावर रंगीत बेगड लावून सजवला जातो. केळीची जर्द हिरवी पाने पंगतीत चोळखा म्हणून ताटाऐवजी वापरली जातात. लाल केळफुलांची भाजी तर फारच स्वादिष्ट लागते. रसरशीत पिकलेल्या केळीच्या घडांनी केळ लवंडली, की त्या फळभारित केळीचे रूप फार सुरेख दिसते. केळी ही बहुजनांची फळे आहेत. भुकलेल्या पोटी दोन-चार केळी खाल्ल्यास पोट भरू शकते. केळी ही अभिजनांचीही फळे ६८ निवडक अंतर्नाद PARASWALE. ge आहेत. केळी ही सर्वजनांची फळे आहेत. गोव्यात मयडोळी गावात किंगसाइज मोठी केळी पिकतात. त्याचा गोड हलवा करतात. महाराष्ट्रात केळ्यांचे शिकरण करतात. केरळात, कर्नाटकात केळ्यांचे चिप्स करतात. केळे कोणत्याही पदार्थात मिसळल्यास त्याला गोड, मिठास स्वाद येतो. मॉरिशसमध्ये गेल्यावर तिथे भारतीय लोकांच्या घरांच्या पुढील परसात केळ लावलेली मी पाहिली. त्यानंतर माझ्या लक्षात आले, की आपण भारतात केळ कधीच घराच्या पुढील परसात लावत नाही. कारण केळ आपण अशुभ मानतो. माणूस मृत झाल्यावर त्याचे पार्थिव केळीच्या गभ्याचे तीन तुकडे करून त्यावर ठेवतात. मूळ कथा अशी की आदि शंकराचार्यांची आई निवर्तल्यावर तिचे पार्थिव नेण्यासाठी कोणीच येईना. कारण आदि शंकराचार्य त्या काळाच्या संदर्भात हिंदू धर्मांतले बंडखोर होते. म्हणूनच त्यांना पुढे प्रच्छन्न बुद्ध म्हणू लागले. त्यामुळे आदि शंकराचार्यांनी आपल्या आईच्या पार्थिवाचे तीन तुकडे केले आणि ते स्मशानात नेले. त्यानंतर ही चाल पडली. अन्यथा इतर धार्मिक सणांत आपण केळीला पवित्र स्थान दिले आहे. हिंदू धर्मात अनेक विसंगत गोष्टी आहेत. पौर्णिमा पवित्र मानली आहे, अमावस्या अपवित्र मानतात. पण हिंदू धर्मातला सर्वांत पवित्र सण दिवाळी अमावास्येला येतो. केळीचे झाडही अशाच विसंगतीला बळी पडले आहे आंबा आंब्याचे झाड हे मोठे तृप्त, संतृप्त, समाधानी झाड आहे. आंब्याचे झाड पाहिले, की मला बुद्धांच्या 'मुदितेची' आठवण येते. आंब्याचे झाड हे मुदितेचा दृश्यावतार आहे. हे आत्ममग्न, अंतर्मुख, सजग, संन्यस्त झाड कुठल्यातरी अनुपम आंतरिक आनंदाचा उपभोग घेत मग्न आहे असा मला त्याच्याकडे पाहून भास होतो. ह्या झाडाचा हा आंतरिक आनंद त्याच्या फळांच्या माधुर्यातून आपल्याला चाखायला मिळतो. आपल्या सुमधुर फळांच्या रसांतून हे झाड आपली मुदिता वाटत असते. आंब्याचे झाड हे फार प्राचीन पुरातन झाड आहे वेद, उपनिषदांत, बौद्ध साहित्यात