पान:निवडक अंतर्नाद.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फ्रेंच वास्तुशिल्प रॉजर एन्गर याला देण्यात आले. ऑरोविलचा मास्टर फ्लॅन करण्यापूर्वी प्रतीक म्हणून ऑरबिंदोच्या मदरपुढे होते ते कमळ, निसर्गात कमळासारखे सुंदर, सुरेख, पूर्ण, परिपूर्ण असे दुसरे फूल नाही. आकारलालित्याच्या दृष्टीने कमळ हे कोणत्याही वास्तूला आदर्श ठरावे. पण रॉजर एन्गरला वाटले, ऑरोविलची संकल्पना कमळासारखी स्टॅटिक नसावी, ती एक्सपान्डिंग असावी आणि अचानक त्याच्या डोळ्यासमोर गॅलेक्सी आली. प्रसरणशील आकाशगंगा आली. ह्या लंबगोलाकार आकाशगंगेचे प्रतीक डोळ्यासमोर ठेवून रॉजर एन्गरने ऑरोविलची रचना केली. पण ही रचना करताना त्याला नव्या शहराचा गुरुत्वमध्य हवा होता. ऑरोविलसाठी घेतलेल्या संकल्पित जागेवर एक पुरातन वडाचे अजस्त्र झाड होते. रॉजरने ह्या वडाला नव्या शहराचा केंद्रबिंदू बनवले. आज ऑरोविलात या वड्यभोवती मुक्त, मोकळे मैदान आहे. वडाखाली निवांत बसून ऑरोविलच्या शांत, प्रशांत शांतीचा मनसोक्त अनुभव घेता येतो. ७० निवडक अंतर्नाद सांवर ( शाल्मली ) ग्रीष्माची, सुग्रीष्माची चाहूल सांवरीला सगळ्यात आधी लागते. आणि अचानक सांवर फुलते. त्याआधी आपली सगळी पाने गाळून सांवर निष्पर्ण होते. मग अवचित बांधावरची, मेरेवरची, डोंगरावरची सांवर फुलते. अंगभर फुलते. आपल्या रक्ततांबड्या फुलांनी गच्च भरगच्च फुलते. फाल्गुनातल्या पहाटे सांवरीचे हे पुष्पमंडित रूप मला फार आवडते. फुलभारित सांवर हा पहाटेच्या अंधारात पेटलेला तांबड्या फुलवातींचा लामणदिवाच असतो! सांवरीची ती वसंतपूजा पाहायला दशादिशांतून शेकडो पक्षी येतात. वसंत ऋतूतली काकडआरती गाऊन सांवरीच्या फुलाफुलातला गोड सुमधुर मधाचा नैवेद्य खाऊन, तृप्त होऊन आभाळात उडून जातात. वसंत ऋतू संपल्यावर सांवरीला फळे येतात. यशावकाश फळे उलगू लागतात आणि त्यातून कापसाची पांढरीशुभ्र बोंडे आकाशात भुरूभुरू उडू लागतात. PAWALE A