पान:निवडक अंतर्नाद.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेर्णेच्या डोंगरावर जुने म्हाळ आहे. पाच शतकांपूर्वी कुठल्या काळोख्या रात्री अद्यनाशिनी जुवारी नदी ओलांडून म्हाळशेला अंत्रुज महालातल्या म्हाळ गावात आणण्यात आले. नव्या हार्दी गावातील म्हाळशेला श्वेतवस्त्रावृता जायांची पूजा बांधली जाते. जुन्या म्हार्दोळातील म्हाळशेला जायांचे हे विलोदी वस्त्र आवडत नाही, तिला सांवरीची रक्तफुले आवडतात. जुन्या म्हाळात आत म्हाळशेचे नवे देऊळ बांधले आहे. तिथून थोड्या दूर दोन सांवरी आहेत. सरत्या तिन्हीसांजेला ह्या सांवरीच्या पायाशी बसावे आणि सांवरीच्या फुलांच्या रूपाने सांवरीचे अश्रू पदरात घ्यावे. इतिहासाला अवगत असलेली कुठली तरी गूढ दंतकथा या सांवरी आपल्या पोटात दडवून आहेत, असे उगीच वाटू लागते. सांतान कार्तिक संपून मार्गशीर्ष लागला. हिवाळा सुरू झाला. थंडीचे दिवस आले. डिसेंबर महिना लागला. सांतान वृक्षाला नाताळांची सूलूस लागली. त्याच्या सर्वांगावर चंवर आला. त्याची पाने दिसेनाशी झाली. सगळीकडे फुलांचे घोसच घोस मोहरून आले. सांतान आता वृक्ष राहिला नाही. सांतानाची आता वेल झाली. सांतानाची आता अस्तुरी झाली, पुरुषी देह कमनीय झाला, रमणीय झाला. सांताना आता सांतोण झाली. आमोर झाली, दिवेलागण झाली. सांतोणीच्या उग्र फुलांचा वास सरभवतणी पसरला. याला गंध म्हणता येणार नाही. ह्य सुगंधही खचितच नव्हे. हा परमळ नव्हे. घमघमाट नव्हे. हा केवळ वास, सांतानाच्या श्वासाचा आणि उच्छ्वासाचा वास. सांतानाच्या घामाचा सेंद्रिय वास रात्रभर सांतान या गंधभारात वावरतो. पहाटे वासाचा देठ तुटून त्याची फुले मुळाशी तुटून पडतात. सांतानाच्या मुळापाशी सर्प फिरतात असे म्हणतात. हे विषारी सर्प सांतानाच्या मुळांना दंश करत असले पाहिजेत. सांतानाची मुळे हे विष पिऊन टाकत असली पाहिजेत. त्यामुळेच तर हे विष त्याच्या रंध्रारंध्रात पसरत असावे आणि त्या विषाचाच हा विचित्र वास येत असावा! सांतानाचा मोहोर थोडेच दिवस टिकतो. मग सांतान निष्फूल होतो. सांतानाचा वास अंतर्धान पावतो. मग सांतान एक सामान्य वृक्ष होतो. सांतानाचे सांतानपण त्याच्या फुलांनी नव्हे, त्याच्या सात पानांनी असते. म्हणून संस्कृतात त्याला सप्तपर्ण म्हणतात. सांतान फक्त फुलांतून फुलतो असे म्हणता येणार नाही, तो आपल्या पानांतूनही फुलतो, सांतानाची हिरवीगार पाने ही त्याच्या रसरशीतपणाचा, त्याच्या जित्या, जिव्या टवटवीतपणाचा दृश्यावतार असतो. सांतानाकडे देवळाच्या प्राकारात असलेल्या पुराणपुरुष पिंपळाचे राजबिंडेपण नसते. सगळी पाने आणि फुले सांडून निष्पर्ण, निष्फूल होणाऱ्या चाफ्याचे भणंगपणही नसते. नसते त्याच्याकडे कुळागरातील माडीची शिरशिरीत काया नसते त्याच्याकडे, केळीचे देहलावण्य सांतान हा तसा दुर्लक्षित, अलक्षित वृक्ष आहे. म्हणूनच तो महाकाव्याचा नायक बनू शकणार नाही. सांतान हा शापित गंधर्व आहे तो खंडकाव्याचा उपनायक बनू शकेल. माझ्या लहानपणी आमच्या घराच्या मागील दाराच्या परसात एक सांतान होता, त्याच्याकडे पाहात मी बोलत बसायचो. एका आषाढातल्या उत्तररात्री पावसात सोसाट्याचा वारा येऊन तो माझा बालमित्र सांतान उन्मळून पडला. त्याच्याबरोबर माझे सारे बाल्यही संपून गेले असा भास मला त्या दिवशी झाला. झाडातली माणसे झाडाशी माझी मैत्री झाली आणि झाडे माझ्याशी आपुलकीने, आत्मीयतेने बोलू लागली, तेव्हा एकेका झाडात मला माझ्या जीवनातले स्मृतिशेष मित्र आणि नातेवाईक दिसू लागले. आपली सर्व पाने आणि फुले फेकून बोडकी झालेली सांवर मला तिच्यात माझी पणजी दिसू लागली. पांढराभोर कापूस आभाळात सोडणाऱ्या सांवरीसारखी ती पांढरे वस्त्र नेसायची. डोक्यावर पदर घ्यायची. माझे आजोबा तिला 'बा' म्हणायचे. घरातले सर्व लोकही तिला 'बा'च म्हणायचे. त्या एकाक्षरी शब्दात ॐ काराची गोडी होती. दिवेलागणीनंतर देवखोलीतल्या समईच्या मंद उजेडात बा कुठलीतरी पोथी वाचायची. त्या पोथीचा अर्थ आम्हांला तेव्हा कळला नाही. 'बा'च्या माथ्यावरच्या पदराचाही अर्थ कळला तो फार उशिरा, बा गेल्यानंतर काही वर्षांनी! माझ्या आजीला मी पाहिलेच नाही. ती खूप सुंदर दिसत होती. तिचा एकच फोटो घरातल्या भिंतीवर आहे त्यात ती मोनालिसाप्रमाणे मुग्ध हसते. पाचवा शालू नेसून आणि पाचवा चुडा घालून नवी सून बनून माझी आजी आमच्या घरात आली, तेव्हा ती हिरव्यागार पानाच्या केळीसारखी शिरवंत दिसत असली पाहिजे, ती केळीसारखी मागीलदारच्या परसातच राहिली आणि एके पावशी रात्री कोणाला न सांगता अकाली उन्मळून पडली, तिच्या मरणानंतर माझे आजोबा अनासक्त झाले. विरक्त झाले; पण अध्यात्माच्या नादाला लागले नाहीत. त्यांना ज्ञानाची तहान लागली. ज्ञानाचे फळ चाखल्यानंतर त्यांनी लिहून ठेवले, "माझ्या लग्नापूर्वी हे फळ मी चाखले असते, तर मी लग्नच केले नसते." माझ्या आजोबांनी लग्नापूर्वी ज्ञानाचे फळ चाखले नाही याचा मला फायदा झाला! दत्तात्रेयाच्या देवळासमोर असलेल्या औदुंबराच्या झाडासारखे होते माझे आजोबा ! माझ्या आजोबांना एक काका होते. त्यांना मूलबाळ नव्हते, पण दिगंतरातून येणाऱ्या पक्ष्यांवर प्रेम करणाऱ्या वडासारखा होता तो दादा! एकत्र कुटुंबातील मोठ्या घरातील सर्व मुलाबाळांचा लळा असलेला. वडाचा बॉन्साय केला की माझ्या काळजात चर्र होते. इतर निवडक अंतर्नाद ७१