पान:निवडक अंतर्नाद.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काळ्यापांढऱ्या दिवसांची आठवण काढताना तेव्हाचं रंगांबाबतचं औदासीन्य आठवल्याशिवाय राहात नाही. 'वरलिया रंगा' भुलू नये ही कायमची शिकवण ! वैभव- संपन्नता वगैरे काय कमवायचं ते अंतरंगाचं, ह्य सांस्कृतिक आदर्श वास्तविक आपला खरा लोकप्रिय देव श्रीरंग आहे, त्याच्या रंग खेळण्याविषयी खूप लिहिलं गायलं गेलंय, संस्कृत साहित्यानेही राजीवलोचना, पक्वबिंबाधरोष्ठि, भुंग्यासारखे काळेभोर डोळे असणारी, लज्जेने आरक्त कपोल होणारी असं स्त्रीसौंदर्याचं भरपूर टेक्निकलर वर्णन ठिकठिकाणी केलेलं आहे मात्र ते महाकाव्यातल्या स्त्रियांचं आहे, देवतांचं, नायिकांचं, राजघराण्यातल्या स्त्रियांचं आहे. सर्वसामान्य स्त्रीस त्याचं काय होय ? एकतर आर्थिक वकूब बेताचा आणि प्रापंचिक धबडगा मोठा, शिवाय कोणत्याही प्रसंगी तिचं स्थान नीचतम पातळीवर! यामुळे मग तिनं सौम्य, सोज्ज्वळ, सात्त्विक असणं, रंगरंगोटीपासून कायम हातभर लांब राहणं असे मानदंड तिच्या मनावर बिंबवले असतील. मुळात दारिद्र्याला सात्त्विकतेचा मुलामा चढवण्याचं आपलं नेहमीचं तंत्र इथेही वापरलं गेलं असेल. आणि रंगापासून फटकून राहाणं जनसामान्यांच्या, त्यांच्यातल्या स्त्रियांच्या वाट्याला आलं असेल. (आश्चर्य म्हणजे हा ठोकताळा अजूनही तेवढाच ठोकला जातो. पडद्यावर दिसणाऱ्या खलनायिकांची रंगरंगोटी आजही नायिकांपेक्षा भडक असते, कपाळावरची कुंकवं जितकी रंगीबेरंगी आणि मोठी तितकी त्यांच्या खलत्वाची तीव्रता वाढते. ) 'मळखाऊ' हा कपड्यांचा रंग आणि 'सावळा' हा मुलींचा (विशेषत: लग्नाळू मुलींचा) रंग सर्वाधिक भेटे त्या रंगदुष्ट काळात! 'मळखाऊ' हे विशेषण कपड्याची प्रशस्ती करे, तर सावळा रंग धर्मसंकयतून सोडवे. उगाच थेट काळंबिळं म्हणून कशाला नाराज करा ? आणि गोरंबिरं म्हणून खोट्याचं धनी तरी का व्हा? त्यापेक्षा सावळागोंधळ बरा. ज्याने त्याने आपापलं तारतम्य वापरून 'शेडकार्ड' तयार करावं. रंगांची ही शेडकार्ड निसर्गातल्या रंगांवरून तयार व्हावीत हे ओघाने आलंच, झाडं, पानं, फळं, फुलं, वाळू, माती, ढग, आकाश ह्यांचे - म्हणजे निसर्गाने दिलेले रंगच परिचित असणार. 'सावळाच रंग तुझा' ह्या अजरामर गीतात महाकवी गदिमांनी तरी त्या सावळेपणाचं वर्णन कसं केलंय? तर चंदनाच्या बनापरी सावळा, पावसाळी नभापरी सावळा किंवा गोकुळीच्या कृष्णापरी सावळा! कुठलीतरी, आधुनिक भाषेतली, सिंथेटिक, मेटॅलिक, सायकेडेलिक वगैरे रंगाची उपमा त्यांना देताच आली नसती. कुठली सातासमुद्रापारची झाडं, पानं, फुलं त्यांना आठवलीच नसती त्यांच्यावेळच्या रंगांच्या सीमित दुनियेत. आता निसर्गात, त्याच्या निर्मितीतही रंग जबरदस्ती घुसडायला कमी करत नाही आपण, अनेक भाज्यांना, फळांना कृत्रिम रंग दिलेले असतात. आकाश आणि पाणी ह्यांच्यावर रंगाचे झोत फिरवून नाट्यमयता वाढवण्याचे प्रयत्न होतात. हलके, सूक्ष्म रंग गडद केले जातात आणि सोडले जातात आपल्या डोळ्यांवर आदळायला. पण जेव्हा डोळ्यांवर दृश्यं, रंग आदळत नाहीत तेव्हा माणूस मनाच्या डोळ्यांनी ती बघायला लागतो, कल्पनशक्ती वापरायला लागतो, हा एक लाभच असतो. आठवतंय त्याप्रमाणे जुन्या बऱ्याच मराठी सिनेमांमध्ये हिरॉईन एकदोनदा तरी सौभाग्यसूचक पारंपरिक वेषात पडद्यावर यायचीच. पण सिनेमा तर काळा-पांढरा असायचा. मग त्या ठोकला हिरोला तिच्याकडे सूचकतेने बघत, मिशी कुरवाळत एक वाक्य टाकावंच लागायचं. 'आज एक माणूस ..... .हंहंहंहं, हिरव्या लुगड्यात ....हंहंहंहं .. फारच खुलून आलंय बुवा.... ' इथे प्रेक्षागृहातील सगळी माणसं कल्पनेने त्या नायिकेच्या साडीचा हिरवागार रंग, चुड्याचं काचेरी हिरवेपण, कुंकवाचं जिवंत लालपण बघू शकायची. तिचं 'आमी नै ज्जा' होईपर्यंत तिचा सप्तरंगी साजशृंगार प्रेक्षकांच्या मनाच्या डोळ्यांसमोर पुरा व्हायचा. प्रेमगीताच्या एखाद्या दृश्यातलं काळंपांढरं इंद्रधनुष्य सातही रंगांच्या छटा स्पष्टपणे दाखवायला लागायचंच एका टप्प्यावर ! बटबटीतपणे रंग दाखवण्यासाठी अडत नव्हतं कोणाचंच! आज अशी कल्पनाशक्ती वापरायची गरजही नाही आणि तिला वावही नाही. बघावं त्या माध्यमात, दृश्यात, चित्रात अनन्वित रंगाचार केलेला सापडतो. आहेत हाताशी, तर घ्या वापरून, करा चैन लेको, असा छुपा भाव दिसतो. रंगांबाबतचा हा चंगळवाद डोळ्यांना, संवेदनशील मनांना त्रासदायक होतो हे कोण कोणाला सांगणार ? आताशा एखाद्या देवळाच्या जीर्णोद्दाराचा प्रस्ताव कानावर आला, आर्थिक मदतीचं आवाहन आलं की माझी पहिली प्रतिक्रिया असते ती धसकण्याची! धसका पैसे देण्याचा नाही, तर त्या पैशांच्या मोबदल्यात देवळाच्या कळसावर किती रंग बदाबदा ओतलेले बघावे लागतील ह्याचा, जीर्णोद्धार करण्याची बहुतेकांची कल्पना रंग फासण्याची का असते कोण जाणे! पण असते खरी गाभाऱ्यातल्या मूर्तीपासून आकाशाकडे झेपावणाऱ्या कळसापर्यंत दिसेल ते सप्तरंगात बुचकळून काढतात. आपलं ('आपल्या ज्ञातीचं, 'आपल्या ' देवाचं... तिथेही आपलंतुपलं खूपच!) देऊळ सगळ्या परिसरातल्या इमारतींच्या धक्काबुक्कीत उठून दिसण्यासाठी धडपड सगळी. देवळाच्या पायऱ्या, फरश्या, छतं, गाभारे, प्रत्यक्ष मूर्ती, तिच्या भोवतीची प्रभावळ, अगदी अंगणातल्या दीपमाळासुद्धा जीव खाऊन रंगवून ठेवतात आणि कळसाची रंगसफेदी हा रंगाधळेपणाचा कळसच असतो. अनेक जुन्या देवळांच्या बाहेरच्या दगडी दीपमाळा किंवा त्रिपुरं मूळचे काळे असत आणि वर्षानुवर्षं त्यात लावलेल्या तेलातुपाच्या दिव्यांमधल्या चिकट ओघळाने आणखी काळेकुट्ट झालेले असत. देवदिवाळीला, त्रिपुरी पौर्णिमेला त्यात पणत्या, दिवे लावले की दुरून बघताना त्या दगडी दीपमाळा मागच्या अंधाराशी एकजीव होऊन जात आणि सगळे दिवे अंधारात अधांतरी तेवताहेत असं वाटे, आता ते नेत्रसुख मिळत नाही. एकतर आताचा अंधारही नितळ काळाकभिन्न नसतो. कुठलेकुठले सर्चलाईट्स, सिग्नल्स, फिरते प्रकाशझोत, मोबाइलचे मध्येच उजळून दचकवणारे स्क्रीन्स असे सारखे अंधारावर चरे ओढत असतात. त्यात त्या दगडी दीपमाळांवर रंग फासले असले तर बघायलाच नको. रांगोळीबद्दलही हाच प्रकार झालाय, शेणाने सारवलेल्या, कावेने मढवलेल्या जमिनीच्या छोट्या तुकड्यांवर रांगोळीच्या रंगांच्या नाजूक रेघा ओढल्या की त्या नुसत्या रंगरेखा राहात नसत, निवडक अंतर्नाद ७५