पान:निवडक अंतर्नाद.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भावरेखा होत. अलीकडे एका विशिष्ट गटाची रांगोळी फार लोकप्रिय झालेली आहे. तिच्यात प्रवेशद्वारापाशी, उत्सवस्थळी, रस्त्यावर शेरावारी रंग ओतलेले असतात. त्या त्या स्थळावर नुसता रंगांचा बुलडोझर ओढल्यासारखा वाटतो. त्याने ना सौंदर्य वाढत, ना पावित्र्य अडगळ फक्त वाढते. एरवी ध्वनिप्रदूषणाबाबत एवढं बोलणारा समाज ह्या दृश्यप्रदूषणाबद्दल काहीही का बोलत नाही, हे मलातरी समजत नाही. अर्थात ह्याचा त्रास वायवा एवढीही संवेदनशीलता शिल्लक नसेल तर बोलण्यात काही अर्थही नाही. मध्यंतरी एका कामासाठी मला फोटो काढून घ्यायचे होते. नाक्यानाक्यावर माफक पैशात, अल्प वेळात, रंगीतसंगीत फोटो काढून देणारे खूप लोक उपलब्ध होते. मी आहे त्याहून देखणी (!) आणि रंगीबेरंगी दाखवायला सगळे उत्सुक होते, पण मला 'ब्लॅक अॅण्ड व्हाइट' पोर्ट्रेट फोटो हवा होता. त्यातल्या त्या काळ्या- पांढऱ्या रंगांची नजाकत, रेषांचा नेमकेपणा आणि एकूण वास्तवाच्या जवळ जाण्याच्या शक्यता मला मोहवत होत्या. पण तसा फोटो काढून द्यायला सहजासहजी कोणी मिळेना. आमच्याकडे ती इक्विपमेंट नाही, त्यासाठी लागणारं विशिष्ट प्रकाशतंत्र नाही, आणि मुळात आता 'तसले' फोटो डाऊन मार्केट', समजले जातील अशी उत्तरं मिळाली.. मनात आलं, आता सौंदर्याचे निकषही मार्केट ठरवायला लागलंय! त्याच्या ताकदीपुढे आपलं काय चालणार? एकदोघांनी मात्र मलाच छेडलं, 'तुम्हाला रंगीत फोटोचा प्रॉब्लेम काय आहे पण?' 'फोटोंचा नाही, माझा प्रॉब्लेम आहे. माझ्या जीवनात रंग बऱ्यापैकी उशिरा आले आहेत. म्हणून त्यांच्याशी दोस्ताना नसेल करता येत मला. आम्ही आपले बी अॅण्ड डब्ल्यूवाले...' ७६ निवडक अंतर्नाद कलाक्षेत्रातले दर्दी खूपदा असं म्हणतात की आपल्या देशात संगीतसाक्षरता जेवढी आहे तेवढी चित्रसाक्षरता अजिबात नाही. चित्रं बघणं, समजून घेणं, त्यांचा आनंद घेणं आपल्याला फारसं कळलेलंच नाही, असं काही ऐकलं की मला ते काळेपांढरे दिवस आठवतात. गाणं बापडं बालवयापासून नानाप्रकारे सहजपणे कानावर पडत गेलं, मनामध्ये झिरपत गेलं. रंगरेषा त्यामानाने दुर्लभच राहिल्या. एकतर तंत्रज्ञान अगोदर विरळ होतं. नाना रंगढंगाचे कागद, पॅकिंग मटिरियल, कृत्रिम धाग्यांची कापडं, धातूवर, काचेवर, लाकडावर रंगलेपन करण्याच्या पद्धती, कागद आणि छपाईतली रंगांची चैन वगैरे अगोदर फार काळ हाताशी नव्हतं आणि आलं तेव्हा इतक्या वेगाने आणि इतक्या प्रमाणात आलं की कोणी, कुठे, कसं, कशासाठी ते वापरावं ह्याचं तारतम्यच राहिलं नाही. काळ्यापांढऱ्या रेषा, टोकं, बिंदू, फराटे, कुठे उरूच दिले नाही त्याने, एखादा भूप्रदेश अगोदर दीर्घकाळ पाऊस न पडल्याने, अनावृष्टीने कंगाल असतो आणि नंतर खूप काळ अतिवृष्टीमुळेही कंगालच राहतो तसं काहीसं होतंय का आपलं? हे तर खरंच की अनावृष्टीची, काळ्यापांढऱ्या दिवसांची आंधळी भलावण करून चालणार नाही. रंगांचं चक्र असं मागे नेता येणार नाही. पण दृश्यात्मकतेच्या चित्रसाक्षरतेच्या अभावाबद्दल नुसतीच हळहळ करूनही पुरणार नाही, रंग, माध्यम, पोत, छाया, प्रकाश, वापरायला शिकणारे, शिकवणारे, व्यापारी उपयोग करणारे ह्यांना जबाबदारीची जास्त जाणीव करून देता आली तर..... रंगांबद्दलची अंतरंगातली संवेदनक्षमता वाढवायची वेळ आलीये खरी! माणसे वाचताना... माणसे वाचताना चष्मा काढून ठेवावा जुन्या माणसाला भेटताना नवे व्हावे नवे पान उलटावे पुराणा संदर्भ चाळू नये । माणसे वाचताना विरामचिन्हे ऐसपैस पेरावीत मोकळे मन आनंदाचे महाद्दार असते । आपले वाचन आपणच करावे डोळे आणि कान यांतले अंतर स्मरावे । माणसे वाचताना अडखळलेलेच बरे । मुख्य म्हणजे पट्टीच्या वाचकाने(ही) आपणदेखील माणूस आहोत हे विसरू नये । (दिवाळी १९९५) दीपा गोवारीकर (दिवाळी २०१९)