पान:निवडक अंतर्नाद.pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या नीट लिहायला हव्यात कविता पेन्सिलीचे छिलके काढून टाकावेत तसे काढायला हवे टोक आशयाचे भरभक्कम करायला हवे भूमिकेचे भान विस्तारायला हवाय जाणिवेचा परिसर आणि सारे कसे स्पष्ट नि निधडे हवे उगाच बोटचेपेपणाखाली मुरडायला नकोय कवितेने सकाळी बारा वाजता मुलगा उठतो झोपेतून आणि ब्रश करत करतच उघडतो इंटरनेट घुसवतो चेहरा फेसबुकच्या पुस्तकात आणि त्यातच गढून जातो मुलगा उठल्याचं लगबगीनं ठेवते आई दुधाचा ग्लास त्याच्यासमोर जो पडून राहतो तासन्तास कम्प्यूटर टेबलावर मुलाची परीक्षा आलीय जवळ ऐपत नसताना घेतलंय इंजिनिअरींग पण कळतच नाहीये आईला त्याचं काय चाललेलं असतं ते या नीट लिहायला हव्यात रात्रभर कम्प्यूटसमोर बसून तो नक्की काय करतो, आईला नाही कळत गेम खेळतो, पिक्चर बघतो, चॅटिंग करतो मोबाइलवर हलक्या आवाजात बोलत राहतो पुस्तकं न वाचता, पेमानं न लिहिता तो कसलासा म्हणे अभ्यास करतो कुणाचा तरी मेसेज येताच गडबडीनं बाहेर पडतो मधूनच दोन दोन दिवस गायब होतो तिला वाटतं हळूच जावं त्याच्या खोलीत नि त्याच्या डोक्यावर थोपटत घ्यावं त्याला कुशीत 'काय चाललंय तुझ्या मनात?' विचारावं काटकाळजीनं 'नीट अभ्यास कर रे बाबा' म्हणून विनवावं पण त्याला नाही आवडत विचारलेले असे प्रश्न अंग झडझडून सळसळून उठला पाहिजे अभिव्यक्तीचा पोत नागिणीच्या फण्यासारखा विस्तवातल्या निखाऱ्यागत उजेड पडला पाहिजे कवितेच्या अंगावर, धगीचा असे लिहिता आले तर तसे जगताही येईलच ना? गुंता नाही आवडत दार ढकलून खोलीत गेलेलं मध्यंतरी एक गोड गोजिरी परी यायची त्याच्याबरोबर घरी 'चाची चाची' करत भोवती फिरायची भिरी भिरी आताशा ती न येण्याचं कारण विचारलं तर वैतागलाच फटकन 'तू सारख्या भलत्याच कल्पना नको ना करत जाऊस अशानं आणणारच नाही मी कुणाला घरी म्हणताच गप्प बसते ती तिरीमिरीत बाईक काढून निघून जाणाऱ्या पोराकडे धास्तावून बघत बसते आताही नुसताच पडून आहे हा बेडवर शुन्यामध्ये बघत – वरून शांत पण आत अस्वस्थ (दिवाळी २०१४) तरी होत नाहीय त्याला टोकण्याचं धाडस अभ्यासाचं टेन्शन, मित्रांचं टेन्शन, मैत्रिणीचं टेन्शन ब्रेकअपचं टेन्शन, करियरचं टेन्शन, ट्रॅफिकचं टेन्शन समाजात सुरू असलेल्या भलभलत्या गोष्टींचं टेन्शन 'पोराच्या मनाचा गुंता झालाय नुसता एक गरिबी सोडली, तर सोपा होता आमच्या पुढचा रस्ता... आई पुटपुटते नि झोपलेल्या पोराचं पांघरूण नीट करते झोपेत त्याच्या पिळवटलेल्या बेफिकीर चेहऱ्याकडे बघत रात्रभर बसून राहते.. नामस्मरणानं पापं जळतात पण मेला भात करपतो. अरुण कोलटकर (दिवाळी २०१७) अंजली कुलकर्णी निवडक अंतर्नाद ७९