पान:निवडक अंतर्नाद.pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ह्या कथेतल्या पात्रांच्या नावांचा प्रत्यक्षातल्या कुणा व्यक्तीशी संबंध नाही. वृत्तीशी मात्र निश्चित आहे. कथेत ज्या वास्तूंच्या नावांचा उल्लेख आला आहे, त्या तुमच्या शेजारीपाजारी असल्या, तर तो निव्वळ योगायोग आहे. पण त्यात राहणाऱ्यांना जर तुम्ही ओळखत असला तर तो मात्र योगायोग नाही. आजही प्रासंगिक ठरावी अशी कथा. रात्री साडेनऊ वाजता दारावरची घंटा वाजली तेव्हा प्रमोदच्या कपाळावर आठ्या पडल्या. आत्ता या वेळी कोण आलं असेल? कांचनमृग सुबोध जावडेक पार्वतीसदनच्या पहिल्या मजल्यावर रहाणारं देशमाने कुटुंब जेवण आटपून टीव्हीसमोर बसलेलं होतं. प्रमोद रिमोट कंट्रोलची बटणे दाबत भराभरा चॅनेल बदलत होता. त्याचा मुलगा अभिजित "बाबा असू दे ना हे चॅनेल. आत्ता सुपरहिट मुकाबला सुरू होईल.” अशी विनंतीवजा आज्ञा करत होता. अपर्णाच्या हातात शाळेचं पुस्तक होतं पण नजर मात्र समोरच्या पडद्यावर खिळली होती. "मला घुटन बघायचंय. मेट्रो चॅनेल लावा', स्वयंपाकघरात आवराआवर करत असलेल्या माधुरीनं आतूनच ओरडून सांगितलं. प्रमोदची आईही गवार निवडत टीव्हीसमोर बसली होती. "अभिजित, कोण आहे बघ रे,” प्रमोदने मुलाला सांगितलं. मुलानं दार उघडलं. बाहेर दोघंजण उभे होते. चेहऱ्यावरून सभ्य दिसत होते. एकानं सफारी सूट घातला होता. दुसऱ्यानं पांढरा शर्ट आणि पांढरीच पँट घातली होती. "देशमाने साहेब आहेत का?" "बाबा, तुमच्याकडे कोणतरी आलंय." अभिजित दारातूनच ओरडला आणि आत येऊन त्यानं टीव्हीचा रिमोट ताब्यात घेतला. चरफडत प्रमोद उठून दारात गेला. "काय पाहिजे? मीच देशमाने. " "तुमच्याकडे थोडं काम होतं, साहेब आत येऊ का?" “कसलं काम ? काही सव्र्हेंबिव्र्हें करणार असलात तर " "नाही साहेब, सफारी सूटमधला माणूस हसून म्हणाला. तो हसला तसा त्याच्या तोंडातला सोन्याचा दात दिव्याच्या प्रकाशात चमकला, साधारण चाळीशीचा दिसत होता. चेहऱ्यावर वरवर जरी • अजीजी दिसत होती तरी एकंदरीत व्यक्तिमत्त्वात काहीशी गुर्मी रेखाटन राजेश भावसार निवडक अंतर्नाद ८३