पान:निवडक अंतर्नाद.pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भरपूर पैसे मिळतील आणि काम थांबलं तर पैसे हातचे जातील ह्या कल्पनेनं त्यांनी ठरावाला विरोध केला. प्रत्यक्ष काही द्यावं लागलं नाही. " "वेरी गुड !” "पण साहेब 23 "काय?" पांडेंनी जांभई दिली. "मीटिंगला हजर असलेले एकदोघेजण इंजंक्शन आणणार म्हणत होते. " "त्यांना तसं करता येणार नाही. सोसायटीनंच अर्ज करावा लागतो. सेक्रेटरीची सही असल्याशिवाय कोर्ट अर्ज दाखल करून घेणार नाही.” त्यांनी थंडपणे सांगितलं. "तरीपण मला वाटतं साहेब, आपण तिथलं काम जरा स्पीड अप् करावं. म्हणजे काही खटपटी लटपटी करून कुणी इंजंक्शन आणलंच तरी आपलं काम मार्गी लागलेलं असेल.” "सही है, मी सांगतो आपल्या कान्ट्रॅक्टरला." "ओके साहेब, गुडनाईट” 0 दुसऱ्या दिवशी प्रमोद घरी आला तेव्हा सात वाजून गेले होते. तळमजल्यावर चाललेल्या कामाचे आवाज येत होते. कॉम्प्रेसरचा धडधडाट फरशा कापणाऱ्या यंत्राचा चढत जाणारा आवाज, हातोड्यांचे घाव घातल्याचे आवाज आणि कामगारांचा गलका, “अजूनपर्यंत काम चालूच आहे?” प्रमोदने आल्याआल्या विचारलं. "रोज मी येईतो संपलेलं असतं." "काही विचारू नकोस बाबा, आज तर अगदी चेव आल्यासारखं काम चालू आहे. दुपारी आपल्यावरचे दोघंतिघं सांगायला गेले तर त्यांच्याशी भांडाभाडी केली त्या लोकांनी, " प्रमोदची आई म्हणाली. "वरचे? वरचे कोण?" "ते रे. आपल्या वर राहणारे माणके ते सांगायला गेले होते." आईनं माहिती पुरवली. "मग?" "मग काय? त्यांचं काही ऐकलं नाही कुणी.” फट् फट् फट् फट् असा कॉम्प्रेसरचा आवाज चढत जाऊन एकदम बंद झाला. मग फस्स्स असा हवा सोडल्याचा आवाज आला. दोन क्षण शांततेत गेले आणि पुन्हा कॉम्प्रेसरचा फडफडाट चालू झाला. "पाहिलंस?” प्रमोदची आई म्हणाली. "हे असं चालू आहे सकाळपासून." पाच मिनिटातच प्रमोदचं डोकं उठलं होतं. बिचारी आई दिवसभर हे कसं सहन करत असेल? त्याच्या मनात आलं. जाऊ दे. आता फार दिवस नाही सहन करायला लागणार, ठाण्याला घ्यायचा ब्लॉक, रहदारीपासून अगदी दूर ९० निवडक अंतर्नाद घ्यायचा. मग कारपेट एरिया जरा कमी मिळाला तरी चालेल. पण शांतता हवी. “माधुरी आली?” कोचावर बसून बूट काढत त्यानं विचारलं, “आत पडलीय जरा. डोकं दुखतंय म्हणाली. दिवसभर नोकरी आणि घरी स्वैपाकपाणी, अगदी पिट्टा पडतो बापडीचा. " • तिलाही आता नाही नोकरी करायला लागणार, तिची इच्छाच असेल तर एखादी पार्टटाईम नोकरी बघू दे. जवळपास कुठंतरी. तो आत गेला. त्याची चाहूल लागून ती उठली. "अगं, पड पड उठतेस कशाला?" "चह्य टाकते." "काही नको, अपर्णाला सांगतो." तिचे खांदे धरून तिला बळेबळे बसवत तो म्हणाला, "डोकं दुखतंय ना? उन्हात जावं लागलं का कुठं? गोळी घेतलीस अॅस्पिरिनची?” "घेतली. पण नाही कमी झालं. " "आता जेवल्यावर आणखी एक घे, तोपर्यंत हे खालचे आवाजही थांबतील.” तो म्हणाला खरा, पण मनातल्या मनात त्याला जाणवलं की बहुधा दोन पाळ्यात काम सुरू केलं असावं त्यांनी म्हणजे रात्री अकरापर्यंत थांबायची लक्षणं नाहीत, "आज पोळ्याबोळ्या करत बसू नको. अपर्णाला खिचडी टाकायला सांगतो आणि पाव आणूया. चालेल?” "मला खावसं वाटतच नाहीये. " "असं कसं चालेल ? पोटात काही नसल्यानंसुद्धा डोकं चढतं, दूध घेतेस थोडं ?" "नको. आल्याआल्या घेतलं. " "बरं मग लवकर जेवायलाच करूया. अपर्णा ." असं म्हणत तो बाहेरच्या खोलीत आला. "काय बाबा?” "आज जेवण तू कर खिचडी किंवा पिठलंभात चालेल.” "टाकते. एवढद्य कार्यक्रम बघते आणि टाकते.” “आणि अभिजित, समोरून तेवद्य पाव घेऊन ये." "बाबा, मी अभ्यास करतोय. " "टीव्ही तर बघतोयस, गॅलरीत तरी बस." "गॅलरीत मोठ्यानं आवाज येतो म्हणून आत बसलोय, टीव्ही अपर्णानं लावला. " “असू दे. पण पाव घेऊन ये लवकर, नाहीतर बेकरी बंद होईल.” "बाबा, आमचं सबमिशन आहे उद्याला आधीच वांधे लागलेत. अपर्णाला सांगा ना पाव आणायला." "नको राजा, प्रमोदची आई म्हणाली. "अंधार पडलाय. बेकरीच्या आसपासची वस्ती चांगली नाही. तूच आण, बाळा. "