पान:निवडक अंतर्नाद.pdf/९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणि असंबद्ध शब्द आवाज... ते शब्द म्हणजे एक प्रकारचा "पस्" होता. माझ्या अशा बोलण्यावर तू रागात पाहिलंस माझ्याकडे पण त्या रागातल्या डोळ्यात पाणी होतं. मी तुझा हात हातात घेतला. त्या अंगठ्याला डॉक्टरने पांढरीशुभ्र साडी नेसविली होती. रक्ताच्या कुंकवाचा ठिपका दिसत होता. हे सांगितलं तर त्याच पाणीदार डोळ्यानं पुन्हा रागात पाहिलंस. मग त्या आठवड्यात सोमवार ते शनिवार तुझं ते पहाणं आठवत राहिलो. असं कसं असतं? आं? रागात पाणं अन् पाणीभरल्या डोळ्यानं? छे! त्यातून काय सांगायचं असतं? अन् मग सांगत का नाहीस? किती बेचैन होतो मग मी. "पुढल्या जन्मी तुम्ही बायकांचा जन्म घ्या बायकांच्या जन्माला गेल्यावर कळेल तुम्हाला काय दुःख असतं ते - नुसतं हसायला काय होतं?" हे तुझं आवडतं मत नेहमी ऐकून होतो. एकदा म्हणालो होतो – “पुढल्या जन्मी बाई व्हायला हरकत नाही माझी; पण माझ्या सवयीमुळे माझी फार गैरसोय होईल त्यावेळी. " "कोणती?” मी म्हणालो, "अगं बसच्या प्रवासात प्रत्येक स्टॉपवर उतरून मला. " रस्त्यावरून गप्पा मारीत आपण जात होतो म्हणून घरी असतो तर असा कर्रऽऽकन चिमटा घेतला असतास तू मला! पण त्यानंतर तू मला स्त्री जन्म देण्याच्या भानगडीत पडली नाहीस कधी - आणि त्या विनोदावर मी किती वेळा हसलो होतो, अजूनही हसतो. तू फक्त पहिल्या वेळेसच गमतीदार चेहरा केलास अन् नंतर प्रत्येक वेळेस माझं हे बोलणं ऐकताना घरात कोणी नाही ना - असा चेहरा करून पहातेस का? रागावत पण नाहीस का? ... अशा वेळेस मला कॉलेजचे वात्रट दिवस आठवतात. माझ्या थट्टेखोर स्वभावामुळे माझा एक फायदा होतो. तू खळखळून हसताना तुझ्याकडे पाहात रहाण्याची माझी इच्छा असते, ती पूर्ण होते. आणि याच स्वभावामुळे नुकसान, हो, मोठंच नुकसान होतं. माझ्या गंभीर बोलण्या-वागण्याकडे तू संशयाने पहातेस! कित्येकदा हसण्याच्या कडेवर येऊन तू माझ्याकडे असं पद्यतेस की, आता क्षणात हसण्याचा प्रवाह होणार, पण थांबतेस. माझं बोलणं तुला संशयास्पद वाटतं. त्या उलट माझी थट्टा करायच्या ऐवजी माझ्याशी कितीतरी वेळ मनातलं सांगत रहायची, कुठंतरी नजर ठेऊन आवेगाने बोलत रहायची तुझी सवय! गंमत आहे की नाही ! .... म्हणून तर हे जे तुला सांगत आहे, विचारीत आहे ते तुझ्याशिवाय, पत्राशिवाय...तू माझं कुठं ऐकतेस? मी तर पाहिजे आणि मला पाहिजे ते बोलणं मात्र नको - असं तू का वागतेस?... मग माझ्या मनाचं वासरू होतं... - पण खरं सांगू? तुझ्या सोबत असताना, मी खेळत असतो. अन् तुला सोडून इथे आल्यावर मी अभ्यास करीत असतो तुझा. हो, अभ्यास, तुझ्या बोलण्यातले काही शब्द मला गमतीदार वाटतात! अभ्यास, दुःख, जीवन, मर्यादा, ध्येय आणि ते तुझं वाक्य – "माणसानं कसं स्पष्ट असावं!” म्हणजे काय ? हे वाक्य तर मला माझ्या बायकोचं वाटत नाही. सोमवार ते शुक्रवार तू माझ्याजवळ असतेस आणि शनिवार रविवार - मी तुझ्याजवळ! इथे पाच सहा दिवस गाणी ऐकण्यात, वाचण्यात रमतो आणि परत तुला त्यात शोधत रहातो अगढ़ी तू जसं मॅचिंग ब्लाऊज पीस शोधतेस तसं! - परवा एक उर्दू कविता वाचली अन् त्याच शब्दांत तुला आठवत राहिलो... .मैं जब सोता हूँ थककर तुम सरहाने बैठ जाती हो मेरी हमजाद हो शायद तुम्हे क्या नाम दूँ आखिर । हमजाद म्हणजे सांगू काय ते? माणसाच्या जन्मापासून त्याची सोबत करणारा देवदूत ! माझ्या शब्दांचा पाऊस, पोर झोपली की थांबतो. मग तुझं बोलणं होतं. एखाद्या विषयावर अगदी मनापासून आवेगाने, यात मात्र मी फक्त श्रोता व्हावं असं अपेक्षित असतं आणि तेच मला आवडतं. शब्दांच्या शक्तीनुसार बदलणारे तुझे भाव, तो चेहरा... मग वाटतं, बोलतानाची तू माझी, की न बोलतानाची... खरं खोटं, चांगल वाईट, आपलं परकं या शब्दांत मला नाही बोलायचं गं! माणूस सगळाच आपला असतो हे पण मला माहीत आहेच. पण बोलणं आणि न बोलणं यात फरक असेल की मग? असतेस माझ्याशीच. मला कळतं, तुला काय सांगायचंय, काय गप्पपणाचा तुझा रंग कोणता ? गोरापान की सावळा? तू बोलत बोलायचंय माझ्याशी ते... पण तू जेव्हा काम करताना गप्प असतेस, तेव्हा कशी असतेस? कोणत्या रंगाची? – “आता काम करताना काय बोलावं माणसानं! काऽऽही म्हणता बुवा तुम्ही!" तू चिडतेस. खरंच, मला स्पष्ट नाही सांगता येणार, पण बोलत असतानाची तू आणि न बोलणारी तू यात मी बऱ्याच वेळा हरवलो आहे. पाण्यात उतरून हाताने मासळी पकडण्याचा हा खेळ मी खेळत असतो. माझ्या गप्पात तर कधी तुला एवढं हसताना पाहिलं आहे, की अगदी अंगावर रेलून पुरे पुरे म्हणतेस. सकाळी गावाला निघतानासुद्धा ते हसू विझलेलं नसतं. मग मी मस्तीत काढतो तो आठवडा! तुझ्या लहानपणच्या आठवणी सांगताना तुझा चेहरा आणखी वेगळा होतो, पोरांसोबत मी पण हनुवटीखाली मनगट घेऊन ऐकत असतो. खोपा करायचा तुझा अतिशय आवडता खेळ होता, मी निवडक अंतर्नाद ९७