पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/114

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ धनी आणि चाकर. चाकराशी धन्याने कामाशिवाय फार बोलूं नये की तो उद्दाम होईल. चाकराला अयोग्य त्रास देऊ नये की त्याला कंटाळा येईल. चाकराला मारूं किंवा शिव्या देऊं नये की आपल्याविषयी हलका विचार त्याच्या मनांत उत्पन्न होईल. चाकराला काम सांगावे त्यांत योग्य कारण असले पाहिजे की. तो आपल्याविषयी मनांत बड बडणार नाही. चाकराच्या कामाची बूज अवश्य करावी की त्याला संतोष होऊन कामाची हुरूप येईल. चाकराशी पैशा संबंधी लबाडी करण्याचे मनांत आणूं नये की आपल्याविषयी त्याच्या मनांत विश्वास राहील. चाकरावर योग्य दया ठेवावी की त्याच्या अंतःकरणांत आपल्या विषयी पूज्य बुध्दि उत्पन्न होईल. चाकरावर जुलूम करण्याची इच्छा धरूं नये की त्या मुळे त्याच्या अंतःकरणांत आपल्या विषयी वाईट बुध्दि उत्पन्न होऊन आपला घात करण्याविषयीं तो उत्सुक होईल, चाकराशी वागण्यांत दरारा, उदारता व ममता ह्यांचा प्रसंगाप्रमाणे उपयोग करावा किं जेणे करून आपली ताबेदारी उठविण्यांत त्यांचे अंतःकरण खूष राहील. गुन्ह्या शिवाय चाकराला काढून टाकण्याचा रिवाज ठेऊ नये की जेणे करूंन चाकरीत त्याचे मन स्थीर राहील.