पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/138

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ दैवास पुढे करण्यास त्याला लाज वाटत नाही; परंतु ह्या योगानें परिणामी त्याचंच नुकसान होते, हे त्याला कळते; परंतु तो हैं जगत्प्रसिध्द करीत नाही व आपली बढाई मात्र मारतो ह्याचा परिणाम मात्र तो आपणास जास्त हलका पाडून घेतो. स्वदेश. १ स्वदेश किंवा आपला देश ह्मणजे ज्या देशांत आपल्या वडि लांचा व आपला जन्म झाला आहे; ज्या देशाच्या स्थितीवर आपलें सुख दुःख अवलंबून आहे; ज्या देशांत आपल्या जातीचे, आपल्या मताचे किंवा आपले कल्याण इच्छिणारे व साह्य करणारे देश बांधव आहेत; आणि ज्या देशाच्या अन्न पाण्याचे शुध्द तत्व आपल्या बापाच्या पाठींत उत्पन्न होऊन आपल्या उत्पत्तीस कारण आहे; ज्या देशाची हवा, पाणी, वृक्षाची शितळ छाया, खाद्य पदार्थाचे सेवन, आपल्या वडि. लाने आज पर्यंत उपभोगिले व आपण उपभोगीत आहों व आपले वशंज उपभोगतील ह्यामुळे त्याचे (देशाचे) आपण अभारी आहोत; व ज्या देशाच्या पृथ्वीच्या योगानें उत्पन्न झालों व आखेरीस त्याच पृथ्वीत आपला समावेश होणार आहे आणि ज्या पृथ्वीने आपल्या पृष्टभागावर ह्मणजे छाती वर आपला बोजा उचललेला आहे, असा देश. . २ स्वदेश कसाही असो, पण आपण त्या देशाच व तो आपला