पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/22

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ दुसऱ्यांच्या दुःखाने ज्याचें अंतःकरण कळवळते, त्याच्या हातून खरा उपकार होतो. . १० दुसऱ्याच्या भयाने, शरमेमुळे, किंवा नांवलौकिक मिळ विण्याच्या हेतूने जो उपकार करितो तो, खरोखर उपकारी ह्या मानाला योग्य होत नाही. परंतु दगडा पेक्षां ईट मऊ ह्या न्यायाने निर्लज्ज किंवा अपकारी मनुष्या पेक्षां बरें.. ११ उपकार करणे तो पात्र पाहून करावा; कारण कृतघ्नी, चोर, लबाड मनुष्यांवर उपकार करूं नये. कारण असे केल्याने एक तर त्यांचे कामांत त्यांना मदत केल्याप्रमाणे होते. दुसरे त्यांच्या कडून उपकाराच्या बदल्यांत अपकारा शिवाय काही प्राप्त होत नाही, तर असे केल्याने एक तर सार्वजनिक नुकसान व दुसरे आपले स्वतःचे नुकसान होते. १२ उपकारावर प्रतिउपकार करणारास प्रज्ञ किंवा व्यवहारज्ञानी ह्मणतात; परंतु अपकारावर उपकार करणारास सर्वतः ज्ञानी मटले पाहिजे कारण ते उभयपक्षांस सुखकर आहे १३ अपकारीस उपकार करून त्यालाच पश्चात्तापाची शिक्षा के ल्याने पुनः आपणास साह्य होण्यास आपण एक आधार उप्त न्न केला असे होते. १४ अपकारीस उपकार केल्याने एक तर ओशाळपणाची त्याला शिक्षा होते त्यामुळे तो सुधारतो व दुसरे शरमेने आपल्या बद्दल त्याच्या मनांत पुज्यबुद्धि उप्तन्न होते. सारांश ह्याने दोन्ही साधतात.