पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/4

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लील निबंध कमी करण्यांत आले आहेत. १ परस्त्रीलंपटता, २ भाषण. ३ काम. ४ संन्यास. ५. ब्राम्हण. ६ क्षत्रीय. ७ वैश्य ८ शद्र. ९ जामात. १० स्वशूर. ११ दुर्भगा. १२ वाचन.१३ लेखन. १४ वेश्या. व काही विद्वानांच्या सुचनेवरून रूपांतर करण्यांत आले आहे. जर कोणाच्या मनांत अशी कल्पना येईल की, हे मी माझ्या डोक्यांतून नवीन काढले आहे, तर ते मात्र चुकीचे होय. जरी मी कोणत्याही पुस्तकाची नक्कल केली नाही, तरी पुष्कळ पस्त काच्या अध्ययनांतून माझ्या डोक्यांत आकर्षण करून घेतलेले ज्ञान ह्यांत ओतले आहे. सेक्सपिअर की ज्याला प्राथमिकलेखक मानितात, त्यानेही ज्या पुस्तकानें आपलें नांव वर आणि आहे, त्यां तेले मुख्य भाग अव्यवस्थित व जीर्णावस्थेत आलेल्या इटालिअन कादंबऱ्यांतून घेतलेले आहेत; तर ह्या नीतिज्ञानप्रभेमध्ये जी ज्ञानकिरणें भरली आहेत ती परापूर्वापासून वारसांत उतरत.. आलेली आहेत. असो. हे पुस्तक श्री. महाराजसाहेबांस अर्पण करण्याचा माझा मोठा हेतू होता; परंतु त्यांचें, आमच्या दुर्दैवाने परदेशी गमनानें तो योग आला नाही. जरी शाळ खात्यांतून त्याला मोठा उदार टेका देण्यात आला आहे, तरी त्यापासून जो संतोष होणार त्याहून जर माझ्या राजास माझ्या हस्ताने हे पुस्तक देण्याचे माझ्या नशीबी आले असते, तर मला मोठा आनंद झाला असता ! असो. पुढच्या एखाद्या प्रसंगी सर्वशक्त मान माझे मनोरथ पूर्ण करील... ह्या पुस्तकास शुद्धलेखना संबंधाने व भाषेसंबंधी घेववतील तेवढे श्रम घेतले आहेत, त्या कामी रा. सखाराम गणेश मुजूमदार,