पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/40

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ दुखणे हे मनुष्याला विद्याभ्यासांत व उद्योगांत, एक अकस्मात हरकत आणणारे विघ्न होय. ९ शांत, संतोषी, व विचारी मनुष्यास अकस्मात दुखण्याशिवाय दुखणे बहतकरून होत नाही. कृपणता. कृपणता ह्मणजे जरूरखर्चही न करणे [ पैसा असताही अयोग्य अडचण भोगणें] व दुसऱ्याला साह्य करण्याचे साधन असतांही न करेंण. २ कृपण मनुष्ये धनरक्षणार्थ परमेश्वराचे विश्वासूक दूत आहेत. कृपणतेने लौकिक वाढत नाही किंवा बोज रहात नाही. कृपणावर त्याच्या घरची मनुष्येही प्रीति करीत नाहीत किंवा त्याला चाहात नाहीत. कृपण मनुष्य दुःख सहन करून पै पैचा संग्रह करितो, त्यामुके त्याच्या हयातीत त्याला सुख किंवा यश मिळत नाही, व त्याच्या पाठीमागें जो कर्ता होतो तो थोडक्याच दिवसांत त्या सर्व धनाचा चैनबाजीत फन्ना उडवून अखरीस दुःखी होतो ह्यावरून कृपणता हा अव्वल पासून अखेर पर्यंत दुःख देणारी आहे. ६ कृपण मनुष्याच्या हातून कोणतेही धर्मकृत्य घडत नाही.