पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/51

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ दया म्हणजे परपीडा न करणे किंवा दुसऱ्याचे दुःख ऐकून खूश न होणे. २ क्षमा म्हणजे अकस्मात् झालेला अपराध माफ करणे. ३ शांति म्हणजे कोणी कांहीं अपराध केला तर आपले डोके चढवून त्या बद्दल आपल्यालाच शिक्षा करून न घेणे. ४ धैर्य म्हणजे संकटसमयीं न घाबरतां आपल्या दुःखाच्या नि वारणार्थ उपाय योजणे. ५ दमन म्हणजे इद्रियांना वश ठविणे. ६ सत्य म्हणजे खरेपणाने किंवा सचोटीने वागणे व बोलणे. ७ ज्ञान म्हणजे जाणणे किंवा माहिती करून घेणे. ८ नम्र म्हणजे योग्य ठिकाणी गर्व सोडून वागणे. (कारण दु. जनाशी नम्रतेने वागणे घातक आहे.) ९ उपकार म्हणजे दसऱ्याला संकटसमयी मदत करणे. १० मर्यादा म्हणजे दुसऱ्याचा अपमान न करणे. ११ हे दहा प्रकरचे धर्म मनुष्याने अवश्य पाळीले पाहिजेत. विद्वान्, १ विद्वान शान्तीने वागतो कारण दुसऱ्याच्या अपराधाबद्दल तो स्वतः शिक्षाकरून घेत नाही.