पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/52

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ विद्वान सद्ववचन बोलतो कारण स्वकार्य बिघडून दुसऱ्याशी वैर करण्यास तो इच्छित नाही. ३ विद्वान निराभिमानीपणाने वागतो. कारण तो ज्ञान संपादन करण्यास इच्छितो. विद्वान सत्यतेने वागतो कारण जगाचा विश्वास संपादण्यांत तो धन्य मानतो. विद्वान नम्रपणाने वागतो कारण तो दुसऱ्याचे प्रेम संपाद न करण्यास इच्छितो. ६ विद्वान उद्योगी राहातो कारण तो दारिद्यापासून दूर रहाण्या चा उपाय जाणतो. विद्वान धारलेले कार्य करण्यांत दृढाभिमान धरतो कारण मेहनत व निश्चयाशिवाय काम पार पडणार नाही, हे तो समजू शकतो. ८ विद्वान काम करण्यांत चपळ असतो. कारण पुष्कळ काम करण्याची त्याला उमेद असते. विद्वान बोलण्यांत अस्खलित असतो. कारण विद्या आणि सत्यता ही त्याच्या अंतःकर्णाची भीति व पोकळ लज्जा नाहींसी करितात. १० विद्वान अल्प निद्रा (नियमित ) करितो कारण तो वेळेची किंमत जाणतो. ११ विद्वान आपल्या मनुष्याविषयी दक्षता ठेवितो. कारण त्या ला आपल्या माणसाच्या संरक्षणाची काळजी असते.