पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/59

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राधान्य होत. कारण ह्याशिवाय वरची सर्व प्रकारची जरी प्रतिकूळता असली व मनुष्यांच्या अंतःकणावर दृढ निश्चय व ईर्षेचा मजबूत ठसा उमटलेला असला तर कोणतीही नड आल्याशिवाय देशाटन करण्यांत तो साफल्यता पावतो. १० देशाटनांत आपला मोठेपणा सोडून नम्रता मनुष्यास धरावी लागते. ११ देशाटनांत मनुष्यास नम्र, प्रिय (मर्यादशीर) वर्तनकरून व मिष्ट बोलून दुसऱ्याचे मन आपल्याकडे ओढून घेऊन, त्या. च्या मदतीचा उपयोग करून घेण्याचा वारंवार प्रसंग येतो. व तदनुसार वर्तन करण्यांत न आले तर अडचणींतून व दु;खांतून पार न पडता ती मुकाट्याने सहन करण्याचा प्रसंग येतो. १२ देशाटनांत मनुष्याला मातापिता, बंधु, स्वात्पवर्ग, जात व देश ह्यांचा वियोग सहन करावा लागतो; व भूक, तहान, थंडी, ऊन्ह, अडचण, श्रमही सोसावी लागतात! त्याच्या बदत्यांत तो मानास योग्य दरिद्रापासून दूर होतो, व क्षणिक मायेचे खरे स्वरूप त्याला कळल्यामुळे मोह मायारूपी कपट जाळयांत तो फसला जात नाही. आणि त्याचा स्व. भाव शांत, निश्चयी, व धैर्यवान् देशाटनाने झाल्यामुळे तो बहुतकरून सर्व धारलेल्या कामांत साफल्यता पावू शकतो. त्याला नाना त-हेच्या कला, हुन्नर, युक्ति वगैरेची माहिती झाल्यामुळे देशाटनानें] तो स्वदेशास एक उपयोगी रत्न