पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/72

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[जर तो दुर्जन असेल तर ]; सातवें आपला भार त्याच्यावर कमी कशा रीतीने पडेल ह्याचाही विचार करून वर्तन करावें. आठवें त्याच्याशी बोलण्यांत व वागण्यांत विचाराने चालावें की विनाकारण आपणास हलके पाडण्यास त्याला कारण सांपडणार नाही. जित परतंत्रता. परतंत्रता म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेन रूप वागणे, अथवा आज्ञानुसार वर्तन करणे. आपल्या शुभेच्छकाच्या इच्छेनुरुप वार्तणे हे आपल्या फायद्या करितां आहे; परंतु परक्याच्या तंत्राने वागण्याचा प्रसंग येणे हे आपल्या अनिष्टास व त्याच्या हितास कारण होय. जितकी परतंत्रता जास्ती असते तितकी जोखीम कमी असते. जितकी स्वतंत्रता असते तितका मनुष्य काळजीने महेनतीने व दक्षतेने वागतो. ५ जितकी परंतत्रता असते, तितका मनुष्य निष्काळजी, अव्यव. स्थित दुसन्यावर अवलंबून, व निरुत्साही असतो. परतंत्रता दुर्बळात आपल्या बचावा करितां स्वीकारावी लागते किंवा कबूल करावी लागते हहणजे परतंत्रता ही दुबलाचें सबळापासून रक्षण करविते.