पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/91

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वृद्धधर्म. वृद्धास्था म्हणजे पूर्ण संसारसुख अनुभवून आपण संपादन केलेल्या ज्ञानाने, अनुभवाने दुसऱ्याचे कल्याण करण्याची व स्वतःच्या मोक्ष साधनाची वेळ. २ वृद्धमनुष्याने कोणावर फार रागाऊं नये कारण आखेरच्या वेळेस आपली प्रतिष्टा पत्नाने संमाळावी. ३ वृद्धमनुष्याने धिमेपणाने व युक्तीने दुसऱ्याला ज्ञानाच्या अर्थात त्याच्या हिताच्या गोष्टी सांगाव्या की आपल्याकडे तो मानाने वर्तेल. ४ वृद्धमनुष्याने घर संबंधी खटपटींत [ भांडण वगैरे ] फार पडूं नाहीं की घरची मनुष्ये आपला फार त्रास न करतील. वृद्धमनुष्याने आनंदित रहावे की दुसरी मनुष्ये रिकाम्या वेळी आपल्या जवळ येऊन बसतील की ज्या मुळे उभय पक्षाची वेळ कर्मणुकीत जाईल. ६ वृद्धं मनुष्याने फार निजू नये की त्याची प्रकृति बिघडेल. ७ वृध्दमनुष्याने चालेल तोपर्यंत उद्योगी रहावें की तो प्रिय होईल. ८ वृध्दमनुष्याने घरांत सर्वाशी सारख्या भावाने वागावें की