पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/126

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११८ ) ( २२ ), सज्जनांचा पारचय करावा. त्यांनी उपदेश केला नाहीं तरी हरकत नाही. त्यांचे सहज भाषण हेच शास्त्र होय. ( २३ ). उंच पर्वताच्या शिखरावरून खडकांवर आपटून शरीर मोठमोठ्या दगडांनी फुटलेले बरे, तसेच तीव्र आहेत दांत ज्याचे, अशा सर्पाच्या मुखांतही हात घातलेला बरा, तशी अग्नीमध्ये उडी टाकलेली बरी, तथापि सदाचार सोडणे ठीक नाहीं. मज भणगाला वरदा । वर जरि करुणा करून देशील ।। तरि मानवती सज्जन बनें जयाला असेचि दे शील । मोरोपंत, ** ** सभास. }} २००५