पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/19

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देऊ नये, व ज्याच्याविषयी ते आधक काळजी दाखवितात त्याविषयी ते मनांत हेवा व मत्सर उत्पन्न होऊ देऊ नये. कारण आईबापांच्या मनांत सर्व मुलांचे सारखेच हित व कल्याण व्हावे असे असते. भावांनीं बहिणींशीं तर नेहमी विशेष प्रेमळपणार्ने वागावे. कारण मुली ह्या मुलांपेक्षा अधिक प्रेमळ व कोमल स्वभावाच्या असतात. त्यांना स्वभावतः दांडगाई व उद्धटपणा अगदी आवडत नाही. त्यांना कोणीं टाकून बोललें, अगर त्यांशीं कोणीं कठोर भाषण केलें म्हणजे तें त्यांना फार झोंबते. त्या फार थोड्या दिवसांच्या आपल्या सोबती असतात. कारण मुली ह्या बोलूनचालून परक्याचे धन आहे, त्या चार दिवस आपल्या येथे मुक्कामास आलेल्या असतात. त्या लग्न होऊन एकदां परक्याच्या घरी गेल्या म्हणजे त्यांचे दर्शन होणेसुद्धां दुर्लभ होते. म्हणून जेवढा त्यांचा सहवास घडेल तेवढ्या वेळांत त्यांशी प्रेमळपणाने वागून त्यांना सुख देण्यास झटावे. आईबापांच्या पश्चात् त्यांचा नेहमी समाचार घेत जावा. | भावंडांवर प्रीति करण्यामुळे जे सुख उप्तन्न होते ते फार उत्तम अते. संकटप्रसंगी या सुखासारखी उद्वेग हरण करणारी दुसरी फारच थोडी सुखे असतील. बंधुभगिनीप्रेम हा सद्रुण फार आनंदप्रद आहे. यापासून दुसरा कोणताही प्रत्यक्ष फायदा झाला नाहीं तरी आपण आपल्या भावंडांवर प्रीति करतों या विचाराने मनास जे समाधान वाटते ते सुद्धां कांहीं कमी नाहीं. ७ - बंधूविषयी कोणत्याही गोष्टी संबंधी कपट आपले मनांत