पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/94

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८६ ) तो त्यांच्या स्वप्नांही नसतो. त्यांचे चित्त सर्वकाळ आपल्या | स्वार्थावर असते. तो ज्यांत साधेल ते ते करीत असतात. त्या पुढे धन्याचे हित त्यांस दिसत नाहीं. आंगच्या उधळेपणामुळे जसे कांहीं श्रीमंत मोडकळीस आलेले असतात, तसेच चाकरांनी नाडिल्यामुळे धुळीस मिळालेले असे पुष्कळ श्रीमंत असतात. यासाठी धन्याने आपल्या कामास आपण स्वतः सावध असावे. केवळ चाकरांच्या विश्वासावर त्याने राहू नये. गुरुवर्य केरोपंत छत्रे. । ' थोड्या वर्षांपूर्वी रावबहादूर केरो लक्ष्मण छत्रे या नावाचे एक विद्वान व विद्याव्यासंगी पुरुष होऊन गेले. ते ऍण येथील ट्रेनिंग कॉलेजांत गणिताचे मुख्य अध्यापक होते. एकदां सदर कॉलेजांत विद्याव्यासंगा संबंधाने बोलणे निघाले असता एका विद्यार्थ्याने सदर गुरुवर्यांना नम्रतेने विचारले की, * नानासाहेब, आपण पहिल्यापासूनच गणितांत असे तरबेज होता काय ? यावर ते म्हणाले * वर्गात, गणित विषयांत, माझा चवथा, पांचवा नंबर होता. त्यावर त्या विद्याथ्याने पुनः प्रश्न केला ५६ मग आपल्या वर असलेले विद्यार्थी मागसले व आपण पुढे सरसावला हे कसे ? ?' तेव्हां ते म्हणाले 4 अहो, वर्गात नंबर कितवा आला ह्याची काळजी मी करीत नसे. गणिताचे जे प्रश्न गुरु जी घालीत त्यांची उत्तरे मला बरोबर