पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/12

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साचा:Center...स्व कमाईचं सुख...

स्वाती भागवत साबळे

–... ...शिकण्याची प्रचंड इच्छा असलेल्या स्वातीला घरात सुरु असलेल्या तिच्या लग्नाच्या चर्चा टाळून पुढे शिकायची संधी मिळाली आणि तिने त्या संधीचं सोनं केलं. आई-वडिलांनाही आता तिचा अभिमान वाटतो. - ... .. ....  शिरुर तालुक्यातलं लोणी स्वातीचं गाव. घरी सहा एकर शेती आहे. आहे आणि वडील शेती करतात. दोन मोठे भाऊ कमावते आहेत. गावात दहावीपर्यंत शाळा आहे. दहावीपर्यंत शाळेत जायला कुणाची ना नसते. पण त्यानंतर शिकायचं तर शिरुरला जायला लागतं. तेही गावापसून मुख्य रस्त्यापर्यंत तीन किलोमीटर चालत जायचं. तिथून शिरुरची बस पकडायची. वाट रानातून, झाडाझुडपातून जाते. सोबतीशिवाय या वाटेनं एकटीने जाणं म्हणजे संकटाला आमंत्रण.
 त्यामुळे कुधी मुलींना दहावीनंतर पुढे शिकवायचा विचारच करीत नसे. स्वातीला शिकायची इच्छा होती. आई सकाळी उठून शेतात जायची. घरातलं काम तिच्यावर पडायचं. हंगामात शेतीसाठी मदत करावी लागायची. त्यातूनवेळ मिळेल तशी शाळा आणि अभ्यास. दहावी पूर्ण होईपर्यंत कुणी काही म्हटलं नाही. पण स्वातीला पुढे शिकवायची घरात अजिबात तयारी नव्हती. तिला किमान टायपिंग शिक यचं होतं. जमल्याएमएसआयटीचा कोर्सही पूर्ण करायची इच्छा होती. एक दिवस तिने घाबरतच वडिलांसमोर प्रस्ताव मांडला. म्हटलं, मी पहाटे घराबाहेर पडून हे दोन्ही कोर्स पूर्ण करेन. दहा वाजता घरी येईन. घरातल्या कामांवर याचा काही परिणाम होऊ देणार नाही.' वडील नाही म्हणाले नाहीत. सुदैवाने सोबत गावतल्याच काही मैत्रिणी होत्या. पहाटे पाचला उठून एकमेकींच्या सोबतीने चालत मुख्य रस्त्यावर येऊन बस पकडत त्या शिरुर गाठायच्या. सगळ्यांनी अकरावीला प्रवेश घेतला होता. पण कुणी