या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरपंच : ते काय बी नाय दारुबंदी काय व्हायची नाय. हौसा मान्याबी दारुबंदी करणारच. त्यासाठी मला काय कराय लागलं ते मी करणार. सरपंच : हौसे, उगाचचं डोक्याचा कांदा करू नगस. (सरपंच रागाने निघून जातो.) निवेदक : या सर्व गोष्टींचा विचार करून हौसा ग्रामपंचायतीत ग्रामसभा बोलावते. (सभेचे दृश्य) पो.पाटील : डायरेक सभा बोलावली सरपंच काय झालयं सरपंच तुमच्या गाढवपणाशुलं या हौशीला सरपंच बनीवलं आता ती माझ्या नरड्यावर बसतीया. दारुबंदी कराय नीगाली. (सभा सुरू झाली.) हौसा : या या गावची सरपंच या नात्याने ग्रामसभा बोलवली हाय. ही सभा बोलवण्याचं कारण की, आपलया गावात दारुबंदी व्हावी म्हणून ठराव घ्यायचा आहे. रम्या : अवो सरपंच बाई पण दारुबंदी म्हणजे गावातल्या काही माणसाचं जीव की प्राण दारुडा : आता काय त्यासाठी तर मी तर असं म्हणतो, शूर आम्ही पेदाढ, आम्हाला काय कुणाची भिती गाडी, बंगला, पैशासाठी ग्लास घेतला हाती (सगळे त्याला बसवतात) रम्या आता अशाचं ओ काय? हौसा : अहो, रामभाऊ, तुम्ही तुमचा ईचार करताय. तुम्ही तुमच्या बायकापोरांचा ईचार नाय करत. तुमच्या दारुमुळं तीन टायनाचं आण तरी भेटतया का घरात. सरपंचबाय म्हणत्यात ते समदं बरोबर हाय. आमच्या संसाराची राखरांगोळी कराय दारुच जबाबदार होय. ज्या तुमच्यासंग हाय. गंगी