या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपण दारुबंदी करायची हाय आण जर का ही दारुबंदी झाली नाय तर आपल्या गावातल्या प्रत्येक संसाराची राखरांगोळी होईल. आपल्या पुढच्या पिढीला जर का ही सवय लागली, तर गावाचा विकास अन् देशाचा विकास होणार नाय. गावाला गावपण राहणार नाय. गावातल्या प्रत्येक माणसावर भीक मागायची बारी ईल. जर का तुम्हाला ही सगळं पटत नसलं. तर ज्या या सरपंचकीचा राजीनामा देते. आन् जर का तुम्हाला तुमचं भलं व्हावं असं वाटत असलं तर मग मला साथ द्या. आणि जर तुम्हाल हे मान्य नसेल तर मी माझ्या सरपंचकीचा राजीनामा देते (सर्व गोंधळतात हौसाचा नवरा उभा राहतो) सरपंच : ये हौसा अगं काय चाललय, गंगी : ओ माजी सरपंच ती हौसा तुमच्या घरी इथं सरपंचीन बाई हायत त्या (सगळे टाळ्या वाजवितात) हौसा : चला तर मग लागा तयारीला (सगळे उठतात मतदानाचा प्रसंग, सगळे मतदान करतात व निकालाची वेळ येते) निवडणूक : हे बघा आम्ही निकाल जाहिर करतोय, आडव्या बाटलीला पडलेत ५०२ मत उभ्या अधिकारी बाटलीला पडलेत ३ मत त्यामुळे विजयी झालेले आहेत आडवी बाटली (सगळे नाचतात, मिडीयावाले सरपंच बाईंची मुलाखत घेतात प्रसंग बदलतो) निवेदक : गावक-यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून व आपल्या भल्यासाठी दारुबंदीची मशाल पेटवली. स्त्रीला भेटलेल्या आरक्षणामुळेच हे सिद्ध होऊ शकले.