या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

AMAVATAVAVAJAVAJAVAJAVAJAVAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVA नवरा ऑपरेशन करायचं. त्या आशाताई ए. एन. एन. ताई सांगत होत्या. : ए हौसा, लय बोलू नकोस. मिटींगला जावून लय बोलतीयस. नखरे बंद कर आणि गप्प तपासून ये आणि हो त्या मिटींगला जायचं नाय, सगळं बंद. मलाच अक्कल शिकवाया लागलीस. तुझी हुशारी फक्त चुलीपुरती... कळलं का ?.... कमला ताई रेखा सीन बदलतो : अहो, ताई ती कुटे चुक बोलतं होती ? ती बरोबर बोलत होती. : हो, खरं आहे, पण बाईन बोलायचं नाय. बोलली तर अक्कल शिकवतेस, बाईच्या जातीन लय बोलू नये, बाईनं पुरुषांच्या मध्ये नाक खुपसू नये, बाई लय चडिल हाय, असे शब्द वापरतात. हौसा बरोबर होती, पण तीच ऐकणार कोण ? : मुग ताई, पुढे हौसाचं काय झालं? ती गेली का तपासायला? :: घरातल्या कुटुंबासमोर तिचं काहीचं चाललं नाही. ती गेली बीडला तपासायला. डॉक्टरचं २०,००० रुपये घेतले, तपासलं आणि तिला परत मुलगीच होती. नवन्यान, घरच्यांनी तिलाच दोष दिला. नवन्याचा मुलगी आहे म्हणून खाली करायचा विचार होता. पण पैसे जास्त लागत होते म्हणून ती पोटातली मुलगी वाचली आणि जन्माला आली. । : चला, शिरूर कासारमध्ये एका मुलीची भर तर झाली नाहीतर अशा मुलगा-मुलगी तपासून शिरूरमध्ये मुलींची संख्या कमी झालीये. : हो, पण हौसाला जनातनं लय आनंद झाला. कोणत्याही आईला जगात आपलं लेकरु प्रिय असतं. मग तो पोरगा असूदे नायतर पोरगी. सविता ताई VNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNY