या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

AN NNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNYA सगळे : अहो, पण कोणाला? नाव काय? निवेदक : ही आहे प्रजासत्ताक देवाची. सगळे : प्रजासत्ताक देव. हा कुठेला देव ? निवेदक : या प्रजासत्ताक देवामुळे आपण बोलतो, वावरतो, सर्वत्र संचार करतो, ते या देवामुळे. तिसरी बाई : एवढा पावरफुल देव हाय. निवेदक : हो पावरफुल्ल देव हाय. पण ही पावर दिसत नाय. ती फक्त जानवते. चौथी बाई : अहो, पण असते कधी यात्रा? निवेदक : २६ जानेवारीला याची यात्रा असते. त्यात लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळे झेंडा फडकवून सलामी देतान ना ! पाचवी बाई : झेंड्याला सलामी तर १५ ऑगस्टला पण देतात ना ! निवेदक : तो स्वातंत्र्य दिवस. त्या दिवशी ब्रिटिशांना हाकलून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९४९ रोजी आपला देश कसा चालावा, कुणी चालवावा याचे नियम घातले गेले. पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून या दिवशी देशाला अर्पण केले. तो हा दिवस म्हणजे २६ जानेवारी. सहावी बाई : बरं मग आमचा काय संबंध याच्याशी? निवेदक : अग, या राज्यघटनेमुळेच आपल्याला मताचा अधिकार मिळाला. टाटा, बिर्ला, अंबानी यांनी एकमत आणि गरीबातल्या गरीबालाही एक मत आणि या घटनेमुळेच आपल्या मताचा अधिकार मिळाला. MATALATATATAVAJAVATATATATATATATATATATATAVATATATAAVATATATATAT LAMNNI