या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

NNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNN सातवी बाई : बरं पण याचा आज काय संबंध? निवेदक : २६ जानेवारीला जी महत्त्वाची ग्रामसभा होते, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २५ तारखेला फक्त महिलांची ग्रामसभा होते आणि या सभेत महिलांच्या अनुषंगाने वेगवेगळे विषय सभेत घेतले जातात व त्यानुसार ग्रामपंचायतीने काम करणे भाग पडते म्हणून आपण ग्रामसभेला यायचं. आठवी बाई: अगं, पण आमी कधीच जात नाय. आमच्या गावात चालत नाय बायांनी असं चावडीवर यायचं. (सीन बदलतो) सरपंचाचा प्रवेश आश्विनी : सरपंच ओऽऽ सरपंच. सरपंच : काय ओ ताई, काय म्हणता? आश्विनी : अहो सरपंच, २५ तारखेला महिलांची ग्रामसभा हाय म्हणतात. सरपंच : त्या आशाताई म्हणत होत्या, २५ तारखेला फक्त महिलांची विशेष ग्रामसभा हाय म्हणून. हाय ना ओ ग्रामसभा सगळ्या महिला येणार हाय. सरपंच : अरे देवा, मी तुम्हाला सांगायलाच विसरलो. या या ग्रामसभेला. (आश्विनी जाते.) (सरपंच ग्रामसेवकाला बोलावतो.) सरपंच : ओ ग्रामसेवक साहेब, ओ आण्णासाहेब. AMAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAJAVAAVAJAVAJAVAJAVA