या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ATIAN NNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNNN ग्रामसेवक : काय झालं सरपंच साहेब? सरपंच : काय हो चाललं है २५ तारखेला. महिलांची ग्रामसभा हाय म्हणं. ग्रामसेवक : अहो, गावात बॅनर लागलेत. महिलांनी ग्रामसभेला यावं म्हणून. सरपंच : आता हो, आता काय करायचं? आता महिलांना घ्यावचं लागल. मला वाटतं न्हाय यायच्या! ग्रामसेवक : आल्या तर? सरपंच : समजा आल्या तर सह्या आणि अंगठे घ्यायचे आणि चहा पाणी करायचं. मग झालं. (सीन बदलता) ग्रामसभेचा सीन सरपंच : हे बघा, आजच्या या महिला ग्रामसभेला उपस्थित राहिलात याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद ! तुम्हाला काय बोलायचं ते बोला. १ बाई : सरपंच आत्तापर्यंत आम्हा बायांसाठी तुम्ही काय पण केलं न्हाय. सरपंच : अहो मावशी, असं कसं म्हणता. आता मी गावाला रस्ता, गटर, आपल्या देवाच्या मंदिराचं काम पूर्ण करणार हाय. हा काय विकास व्हाय. वो सरपंच, आम्हां महिलांसाठी विशेष काय केलं ते सांगा. ३ बाई : गटर, रस्ता म्हणजे विकास व्हाय. आम्हांसाठी काय केलं ते सांगा. ४ बाई : आपल्या गावात अंगणवाडीत बसायला जागा न्हाय. बारक्या पोरांची बसायला हाल होतात. २ बाई MATALATATATAJAATATATATATATATATAVATATATAVATATATAJATAVATATATAT' INIVE (