या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनोगत प्रिय साथी, खरे तर पथनाट्याची संहिता नसावी, प्रश्नांवर चर्चा करून उत्स्फुर्तपणे पथनाट्याची संहिता आकाराला येत असते. परंतु बदललेल्या गतिमान जगात यासाठी वेळ देणे कधी कधी शक्य नसते. इन्हणून या पुस्तकाद्वारे स्त्री-पुरुष विषमता आणि हिंसा' या विषयावर भाष्य करणारे 'समता युवा जागर'च्या माध्यमातून तयार झालेल्या आणि सादर झालेल्या पथनाट्याच्या काही संहिता आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. पथनाट्य संहिताही शब्द कानी आणि सादरीकरणाच्या माध्यमातून आकार घेत जाणारी कलाकृती आहे. आपण वाचक म्हणून ही पथनाट्ये व लघुनाटीका केवळ वाचणार नाही तर ती सादर कराल आणि आपल्या विचारांची त्यात अधिक भर घालाल, अशी आशा आहे. एक कलाकार म्हणून नाटक, शाहीरी, वादव, माहितीपट, पथनाट्य अशी विविध माध्याने विचार मंचावर गेली २० वर्षे स्त्री-पुरुष समतेचा धार्मिक आणि जातीय सलोख्याचा विचार आणि विषय घेवून मी सातत्याने करत आलो आहे. आपण सर्वांनी वेळोवेळी नेहमीच ते कौतुकाने स्वीकारले आहे. तुम्ही केलेल्या बहुमोल सूचनांनी एक व्यक्ती म्हणून आणि कलाकार म्हणून मला समृध्द केले आहे. त्याच प्रेमाने या पुस्तकाचे तुम्ही स्वागत कराल, याची खात्री आहे. या पुस्तकांची अक्षर जुळणी व मांडणी करून देणारे धनंजय यादव, पथनाट्य सादर करणारे 'समता युवा जागर' चे कलाकार, शिरूर कासार, जि. बीड येथील किशोरी प्रकल्पातील सर्व कलाकार, 'लेक लाडकी अभियानाचे सर्व कार्यकर्ते, यु.एन.एफ.पी.ए. च्या अबुजा गुलाटी, शुद्धलेखन तपासून देणारे प्रा. संजीव बोडे तसेच बसंती दायमा यांचे विशेष आभार...!