या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्प र्श (लघुताटिक) निवेदक : मित्रांनो नमस्कार, आज खरच एका वेगळ्या विचाराने आपण प्रेरित होऊन समानता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. समानता, गर्भातल्या मुलीपासून ते म्हातान्या बाईपर्यंत व जन्मभर. दिल्लीतील निर्भयाच्या प्रकरणानंतर भारतात महिलांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न बनला. सामुहिक बलात्कारासारख्या घटना घडू लागल्या आणि लहान लहान मुलीवरही सामुहिक बलात्कारासारख्या घटना घडू लागल्या आणि भारत स्त्रियांसाठी असुरक्षित बनला म्हणून घरातल्या, नात्यातल्या माणसांपासून ते अनोळखी माणसांपर्यंत.. (घरातला सीन, लहान मुलगी खेळती आहे, आई स्वयंपाक घरात आहे. बेल वाजते आई आतून छकुलीला दरवाजा उघडायला लावते. छकुली दार उघडते दारात एक पुरुष असतो.) पुरुष : आहेत का बाबा? छकुली : नाही बाबा ऑफिसला गेलेत. आई : (बाहेर येत) कोण आहे छकुली? अरे अहिरे साहेब या... या... बसा बसा पाणी आणते. (पाणी आणायला आत जाते.) अहिरे : है... काय करतीऐस छकुली. छकुली : खेळतीये अहिरे : बर ... बर... (आई येते पाणी देते)