या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

छकुली : ते मला हात लावत होते. केसांवरून हात फिरवला त्यांनी. आई : हो... हो... मला म्हणाले भलतीच गोड आहे हो तुमची मुलगी. छकुली : पण आई. आई : चल मला कान आहेत स्वयंपाक करायचाय. (छकुली एकटी आहे आई निघुन जाते स्वयंपाक घरात छकुली शेजारी असल्याने बाहुली हातात धरते व अहिरे काकांप्रमाणे तिला हात लावतात दुसन्या हाताने बाहुली लांब घेते पुन्हा हात लावतात हा सगळा मुक अभिनय करणे शेवटी ती बाहुली फेकते तेवढ्यात आई येते व बघते.) आई : (ओरडून) छकुली ऽऽऽ (छकुली पळत जाऊन आईला मिठी मारते व रडते) छकुली : आई ते काका मला त्रास देतात, कुठेही हात लावतात आई : छकुली ऐ छकुली सॉरी बेटा भीच दुर्लक्ष केल पण आता नाही आता येऊदे त्या आहिरेला (छकुली हासते) निवेदक : बघितलत छोट्या छोट्या लहान मुलांच्या गोष्टींकडे आपण किती दुर्लक्ष करतो त्या छकुलीला तो स्पर्श जाणवला तिने आईलाही सांगितला. पण आईने दुर्लक्ष केले. प्रत्येक गोष्टीकडे आता डोळसपणे बघण्याची वेळ आली आहे. अगदी जवळच्या नातेवाईकांपासून ओळखीच्यांपर्यंत...