या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सगळे बाई बाई३ बाई चर्चा करताय. पाळी म्हणजे दर महिन्याला मूल जन्माला घालण्यासाठी गर्भाशय तयार होते. सगळी तयारी करते आणि जर स्त्रीयांचे आणि पुरुषांचे बिजाचे मिलन नाही झाले तर ते अंडाशय फुटते त्यातून रक्ताच्या गाठी बाहेर पडतात. रक्ताच्या पाट वाहतो. योनीमार्गातून.... : बंद करा. बंद करा हे बोलणे. : अरे वा बाईच्या पाळी विषयी जाहिरपणे चर्चा करताना लाज नाही वाटली तर बाईची पाळी कशी येते हे ऐकायची लाज का वाटते? : बाईची पाळी म्हणजे पुरुषाची निर्मिती आहे. ज्या दिवशी ही निर्मिती संपेल तेव्हा पुरुषाचा जन्मही संपेल. निसर्गाच्या निर्मितीतला एक महत्वाचा भाग बाई. ती निर्मिती आहे. सृष्टीची ती निर्मिती आहे... : सगळी व्रत, वैकल्य, जप, धर्म याचे ठेकेदार पुरुष आणि सांभाळणा-या बायका आणि हो ओ धर्माचे ठेकेदार (भटजींना) या ऋणेश्वराने समानतेने रहा असे सांगितले आहे. भजन म्हणतात ना त्यांचे आणि काय हो या ऋणेश्वराच्या आईला पण पाळी आली असेलचना म्हणून तर त्यांचा जन्म झाला. (सगळे भटजी गडबडतात.) ऐ चला गं देवाच्या दर्शनाला सगळे जातात. (चॅनेलवाला व कॅमेरामन पण) : आपण बघितले की कशाप्रमाणे महिला बंड करतात पण जिथे जिथे अशाप्रकारे महिलांना नाकराले जाते त्यांच्या मूलभूत हक्कांपासून दूर ठेवले जाते. काही मंदिराच्या बाहेर महिलांना गाभान्यात प्रवेश नाही. असे बोर्ड दिसतात. आपण लूकी काय साधतोय. एका धर्म निरपेक्ष समाजाची स्थापना की धर्मावर आधारलेली, स्त्रियांना आणि कमकुवतांना दाबून टाकणारी व्यवस्था. जी पत मूठभर श्रीमतांच्या व वरच्या जातीतल्या लोकांच्या हातात आहे. निर्णय आपणच करायचा आहे. चला तर मग आपण आपल्या घरापासूनच सुरुवात करुयात. कॅमेरामन संतोषसह भी कुमार यादव. समता चेंनल...