या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शोध समतेचा (विक्रम वेताळाला शोधतोय राजा विक्रम स्टेजवर प्रवेश करतोय. विंगेत जातो वेताळाला पाठीवर ठेवतो व चालतो.) वेताळ : राजा मला माहितीये तु बोलणार नाहीस कारण तू बोललास तर मी परत झाडावर जाईन. काय म्हणतोस? (विक्रम फक्त हसतो बोलत नाही.) हेम म्हणजे तू बोलणार नाहीस. तू बोलला नाहीस तर रस्ता उरकणार कसा? (राजा परत वेताळाकडे बघून हसतो.) बर बाबा नको बोलूस चल मी तुला एक गोष्ट सांगतो. चालेल ? म्हणजे तुला कंटाळा येणार नाही. (राजा मान हालवतो.) राजा, एक आटपाटनगर होत. त्या नगरीचा एक राजा होता. त्याचा एक प्रधानजी होता एक दिवशी राजदरबारात एक साधू येतो. (सीन बदलतो, राजाचा महाल, साधू प्रवेश करतो सोबत प्रधानजी) : अरे वा...वा...वा... प्रधानजी तुमच्या राजाचा राजवाडा तर सुंदरच आहे. वा...वा...वा... अतिसुंदर. प्रधान : साधुजी आमचे महाराज एकदम दिलदार आहेत. पण जरा भोळे आहेत मनान. एकदम कोणाच्याही बोलण्याने पाघळणार. साधू : बर... बर... (महाराज प्रवेश करतात.) प्रधान : महाराजांचा विजय असो. महाराज : (साधूंच्या पाया पडत) या या साधुजी या आमच्या महालात तुमचे पाय लागले या... या...या... साधू : आम्हालाही आपणाला भेटून बरे वाटले.