या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रधान : अहो महाराज हे साधुजी निघालेच होते. पण म्हणालो जरा चला आमच्या महाराजांना तुम्हाला भेटायचे आहे आणि मग घेवून आलो. महाराज : वा...वा...वा... या साधुजी बसा (साधू बसतो.) कसे वाटले आमचे राज्य ? साधू : अतिउत्तम मला आवडले आपले राज्य पण. महाराज : पण, पण काय? प्रधान : कोणी त्रास दिला का आपल्याला? नाही, नाही. त्रास नाही. पण मला आपल्या राज्यात समतेचा अभाव वाटला. छान असून भागत नाही. समता-बंधूता हेवीच. त्याशिवाय राज्य उन्नत कसे होणार? हे राजा राज्यकारभार करताना नेहमी या गोष्टीच भान ठेव व प्रजेलाही समता-बंधूता जपायला सांग. म्हणजेच तुझे राज्य ख-या अर्थाने समतावादी होईल. फक्त इमारतींचा विकास नको. बर आहे राजा मला निधायला हवे. पुढे जायचे आहे. महाराज : अस कस महाराज जरा भोजन करून जा. प्रधान : जरा विश्रांती घेवून जा. साधू : नाही राजा मी फक्त एकदाच सकाळी एक फळ खातो. बाकी काही नाही. बर आहे राजा. कल्याण होवू दे. (साधू जातो.) महाराज : प्रधानजी बर झालं साधूना तू घेवून आलास. बर वाटलं त्यांना भेटून. प्रधान : मलासुद्धा समाधान वाटले महाराज. महाराज : पण प्रधानजी आपण इतके दिवस राज्यकारभार चालवतोय. सगळीकडे आनंदी आनंद आहे पणहे साधू अस कसं म्हणाले. प्रधान : काय महाराज. महाराज : समतेचा अभाव आहे महणून. इतके दिवस राज्यकारभार करतोय पण ही समता कुठे दिसली नाही आणि कधी भेटलीही नाही. कोण आहे ही समता.