या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सध्याच्या जगात इंटरनेट, फेसबुक, व्हॉटसअप, मेल, ब्लॉग्ज, यूट्युब यामुळे कोणतीही घटना चूक-बरोबर संपूर्ण जगासमोर मांडता येते, पोहचवता येते. असे जरी असले तरी आजही रस्त्यावर सादर होणारे पथनाटय हे चळवळ गतिमान करण्याचे एक प्रभावी आणि जहाल माध्यम आहे. म्हणून चळवळीतील कार्यकत्यांना आणि नाट्यकर्मीना पथनाट्याचे आजही महत्व वाटते. प्रश्नांना थेट रस्त्यावर भिडणारे, समाजावर, माणसांवर प्रभाव पाडणारे, निर्भय माणसाच्या हाती दिलेले हे एक धारदार अहिंसक, शब्दशस्त्रच आहे. पथनाट्य लोकांचे प्रश्न लोकांसमोर मांडून, लोकांमध्येच जनसुनवाई करणारा लोकशाहीचा आविष्कार. पथनाट्याची संहिता, पथनाट्याचे संगीत, पथनाट्यात काम करणारे कलाकार आणि पथनाट्याचा विषय या सगळ्या गोष्टींचा एकाचवेळी, एकत्रित परिणाम करणारा पथनाट्य हा सुंदर नाट्याविष्कार आहे. पथनाट्य सादर करणान्या कलाकाराला फक्त नाटक, कला सादर करता येणे पुरेसे नाही. त्यांची वैचारिक स्पष्टता ही असावी लागते. चुकीच्या घडणान्या घटना, प्रथा, व्यवस्था यांच्या संदर्भातील आपले मत व्यक्त करण्याचा, विरोध करण्याचा, भूमिका मांडण्याचा, दिसायला साधा, सोपा वाटणारा आत्यंतिक प्रभावी नाट्याविष्कार म्हणजे पथनाट्य, सडकनाट्य. सादरीकरणासाठी आव्हानात्मक नाट्यप्रकार म्हणजे सडकनाट्य. स्ट्रीट-प्ले'. समाज बदलासाठीचे प्रभावी माध्यम म्हणजे पथनाट्यच. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीयांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले. सर्वांना दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून दिली. हिंसामुक्त समाज बनणे शक्य केले. परंतु आजही धर्म, जात, लिंगभेदावर आधारित असमानता आणि त्यामुळे होणारी हिंसा ही भारत देशासमोरील सर्वांत मोठी राजकीय समस्या बनली आहे ही समस्या या पुस्तकाच्या रुपाने सादर केलेल्या पटनाट्य आणि लघुनाटीका च्या माध्यमातून समाज मानसात परिवर्तन घडविण्यासाठी प्रभावीपणे काम करतील असा आम्हाला दृढ विश्वास वाटतो.