या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रधान : हो महाराज मला पण कळले नाही यांना कुठे भेटली असेल ? महाराज : नाही नाही साधुंनी सांगितले म्हटल्यावर तिला कुठूनपण आणलीच पाहिजे. प्रधान : पण महाराज ती कुठे राहती, कशी आहे, कुणाची आहे, तिचे आई-बाप कोण आहेत याचा शोध नको घ्यायला. महाराज : अहो पण समता भेटायला पाहिजे तेवढीच खंत साधुंनी सांगितली आहे. (टाळी वाजवतो) कोण आहे रे तिकडे (शिपाई येतो.) शिपाई : महाराजांचा विजय असो. महाराज : शिपाई डोळ्यात तेल घालून राज्यावर लक्ष ठेवा. आपल्या राज्यात समता नाही याच दुःख व्यक्त केलं साधुनी. नीट लक्ष ठेवा आणि ती भेटताच तिला आमच्या दरबारात घेवून या. शिपाई : हो महाराज, पण ती कशी हाय. काळी, सावळी, गोरी, उंची कशी हाय महाराज. प्रधान : महाराजांच्या ओळखीची हाय! अरे मुखा हे सगळं माहिती असतं तर मीच नाहि का... (महाराज ओरडतात) इथ आणली असती. शिपाई : बर बर बघतो. महाराजांचा विजय असो (जातो.) प्रधान : पण महाराज ते साधु असं म्हणले नाहीत की ती कोणीतरी समता नावाची बाईमाणूस आहे म्हणून. महाराज : खरच की प्रधानजी आपण हे लक्षातच घेतले नाही. कोण असेल, कशी असेल. (डोयाला हात लावून बसतो, तेवढ्यात एक आवाज येतो. भाजी ध्या भाजी, गवार, पोकला. प्रधानजी ती भाजीतर नसेल ?) प्रधान : काही सांगता येत नाही. महाराज : प्रधानजी बोलवा तिला. प्रधान : (बोलवतो. दोयावर पाटी घेऊन ती बाई येते.)